Pulwama: पाकिस्तानने LoC जवळच्या 40 गावांना हलवलं, 127 गावांना हाय अलर्ट

पाकिस्तान सरकारने मसूद अजहरला रावलपिंडीमध्ये एका सुरक्षित स्थळी हलवलं असल्याची माहिती समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2019 04:59 PM IST

Pulwama: पाकिस्तानने LoC जवळच्या 40 गावांना हलवलं, 127 गावांना हाय अलर्ट

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली. याची धास्ती आता पाकिस्तानने घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील अनेक गावं स्थलांतरीत करण्यात आली आहेत. त्याचबरोबर अनेक भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या लाईन ऑफ कंट्रोल(LoC )जवळील लोकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील 127 गावांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच LoC जवळील 40 पेक्षा जास्त गावं खाली करण्यात आली आहेत.

पाकिस्तानचा दहशतवादी मसूद अजहरला जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर मुख्यालयातून काढून बाहेर लपवण्यात आलं आहे. पाकिस्तान सरकारने मसूद अजहरला रावलपिंडीमध्ये एका सुरक्षित स्थळी हलवलं असल्याची माहिती समोर आली आहे. रावलपिंडीमध्ये पाकिस्तानची गुप्तचर एजेंसी असलेल्या ISI चं मुख्यालय आहे.

हेही वाचा: आता CRPF च्या जवानांसाठीही विमानसेवा, पुलवामा हल्ल्यानंतर मोठा निर्णय

दहशतवादी आणखी 'मोठ्या हल्ल्या'च्या तयारीत, गुप्तचर यंत्रणांचा सतर्कतेचा इशारा

पुलवामा येथे आत्मघातकी हल्ला केल्यानंतर आता दहशतवादी पुन्हा एकदा भारतीय सैन्याला लक्ष्य करण्याच्या तयारीमध्ये आहे. जैश - ए - मोहम्मह ही दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतीय सैन्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. दहशतवाद्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करण्यासाठी जैश - ए - मोहम्मद पुलवामा हल्ल्याचा व्हिडीओ देखील जारी करण्याच्या तयारीत आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

Loading...

मिळालेल्या माहितीनुसार जैश - ए - मोहम्मदनं 500 किलो स्फोटकं या हल्ल्यासाठी तयार ठेवली आहेत. शिवाय, आत्मघातकी हल्ल्यासाठी वापरली जाणारी गाडी देखील तयार ठेवण्यात आली आहे. तसेच जम्मू - काश्मीर किंवा बाहेर देखील हा हल्ला केला जाऊ शकतो. या संभाव्य हल्ल्याबद्दल लष्कराला सतर्क करण्यात आलं आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते.

भारताच्या केवळ इशाऱ्यानं पाक घाबरलं; मसूदला सुरक्षित स्थळी हालवलं

आयएसआयची मदत

पुलवामा हल्ला करण्यामागे आयएसआय पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेनं दहशतवाद्यांना मदत केली होती. त्यामुळे पुलवामा येथे हल्ला झाला होता. सध्या एनआयए या दहशतवादी हल्ल्याचा तपास करत आहे.

पुलवामात आत्मघातकी हल्ला

300 किलो स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या गाडीवर आदळून 14 फेब्रुवारी रोजी जवानांच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आलं. यामध्ये 40 जवान शहीद झाले. आदिल दर दहशतवाद्यानं स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या ताफ्यावर आदळली होती. दरम्यान, जैश - ए - मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

भारताचा पाकला इशारा

दहशतवाद्यांनी खूप मोठी चूक केली आहे. त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील असा सरळ इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना दिली आहे. शिवाय, पाकिस्तानविरोधात देखील आता भारतानं कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहे. भारतानं पाकिस्तानच्या मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला आहे. तसेच पाकिस्तानी वस्तुंवर 200 टक्के आयात शुल्क देखील लावण्यात आले आहे.


'माझ्या मायचा खून केला पप्पानं, त्याचा पण खून करा'; आईच्या हत्येनंतर मुलीचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 04:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...