मराठी बातम्या /बातम्या /देश /

Pulwama Terror Attack : पाकिस्तानानं व्यक्त केला आनंद, दहशतवाद्यांना म्हटलं स्वातंत्र्यसैनिक

Pulwama Terror Attack : पाकिस्तानानं व्यक्त केला आनंद, दहशतवाद्यांना म्हटलं स्वातंत्र्यसैनिक

पाकिस्तानच्या सरकारनं हल्ल्याचा निषेध केलाय. पण तिथल्या वर्तमानपत्रांच्या हेडलाइन्स वाचल्या तर त्यांच्या लपलेल्या खऱ्या चेहऱ्याचं दर्शन होतं.

पाकिस्तानच्या सरकारनं हल्ल्याचा निषेध केलाय. पण तिथल्या वर्तमानपत्रांच्या हेडलाइन्स वाचल्या तर त्यांच्या लपलेल्या खऱ्या चेहऱ्याचं दर्शन होतं.

पाकिस्तानच्या सरकारनं हल्ल्याचा निषेध केलाय. पण तिथल्या वर्तमानपत्रांच्या हेडलाइन्स वाचल्या तर त्यांच्या लपलेल्या खऱ्या चेहऱ्याचं दर्शन होतं.

मुंबई, 15 फेब्रुवारी : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल नेहमीप्रमाणे पाकिस्तानानं हात झटकलेत. पाकिस्तानच्या सरकारनं हल्ल्याचा निषेध केलाय. पण तिथल्या वर्तमानपत्रांच्या हेडलाइन्स वाचल्या तर त्यांच्या लपलेल्या खऱ्या चेहऱ्याचं दर्शन होतं.पाकिस्तानच्या तमाम वर्तमानपत्रांनी या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिल्यात.  पाकिस्तानच्या द नेशन वर्तमानपत्राची हेडलाइन अशी आहे, 'भारत व्याप्त काश्मीरमध्ये 44 सैनिकांचा मृत्यू, स्वातंत्र्य सैनिकांनी केला हल्ला.'

पुलवामा येथील अवंतीपोरा येथील गोरीपोरा सीआरपीएफच्या ताफ्यावर IEDद्वारे हल्ला केला. हल्लाजैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तानच्या वर्तमानपत्रांमध्ये हीच बातमी मुख्य म्हणून छापली आहे.

पाकिस्तान आॅब्झर्व्हरने हेडलाइन केलीय, भारत अधिकृत काश्मीरमध्ये 44 भारतीय सैनिकांचा मृत्यू, अनेक जण जखमी. याच वर्तमानपत्रात लिहिलंय, गेल्या दोन वर्षात भारतीय सुरक्षा रक्षकांवरचा हा सर्वात भयंकर हल्ला आहे. हा धमाका इतका जोरदार होता की अनेक किलोमीटरपर्यंत आवाज ऐकू आला.

द डॉन अखबारची हेडलाइन आहे, काश्मीर हल्ल्यात 44 भारतीय सैनिकांचा मृत्यू

द ट्रिब्‍यूनची हेडलाइन आहे काश्मीरमध्ये 44 भारतीय सैनिकांचा आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू

'तुम्ही खूप मोठी चूक केली आहे,' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी संघटनांना इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.

या कुरापतींनी आणि भ्याड हल्ल्याने भारतात अस्थिरता पसरेल असं शेजारी देशाला वाटत असेल तर चुकीचं असल्यांच पंतप्रधान मोदी म्हणाले. ज्या वाटेने तुम्ही चालला आहात तो उद्ध्वस्त करणारा रस्ता असून याचे सडेतोड उत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला. या हल्ल्याचा अनेक देशांनी निषेध केला असून भारतासोबत असल्याचे म्हटले आहे. सर्व देशांनी दहशतवाद्यांविरोधात एकत्र येण्याची गरज आहे.

पुलवामाच्या थरकाप उडवणाऱ्या दहशतवादी हल्ल्यात बिहारचे दोन पुत्र शहीद झालेत. यात भागलपूरचे रतन कुमार ठाकूर आणि पाटण्याचे संजय कुमार सिन्हा आहेत. संजय हेड काॅन्स्टेबल म्हणून देशाची सेवा करायचे. तर संजयचे वडील महेंद्र प्रसाद सीआरपीएफच्या 176व्या तुकडीत होते.

संजय एक महिन्याच्या सुट्टीवरून परतले होते. 8 फेब्रुवारीला ड्युटीवर आले होते. ते कँपवरही पोचले नव्हते, तेवढ्यातच दहशतवाद्यांनी डाव साधला. दहशतवादी हल्ल्यात ते शहीद झाले.

घरून परतताना आपली पत्नी बबिता देवी यांना सांगितलं होतं की ते 15 दिवसाची सुट्टी घेऊन घरी येणार आहेत. सुट्टीत मोठी मुलगी रुबीचं लग्न ठरवून ते ड्युटीवर जाणार होते.

त्यांची छोटी मुलगी टुन्नीनंही पदवी मिळवलीय. मुलगा सोनू राजस्थानच्या कोटामध्ये राहून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षेची तयारी करतोय.

संजयचा छोटा भाऊ शंकर सिंगही सीआरपीएफमध्ये आहे. तो नालंदाला असतो. त्याचं कुटुंब मसौढी कोर्टाजवळ नव्या घरी राहतं.

संजयच्या कुटुंबात त्याचे आईवडील आहेत. संजय सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचे. सर्वांना मदत करायचे. या हल्ल्यात संजय यांचा मृत्यू झाल्याची पहिली बातमी त्यांच्या मेव्हण्यांना कळली. अख्खा गाव शोकसागरात बुडाला.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्लात 44 जवान शहीद झाले आहेत. या शहिदांमध्ये संजय राजपूत आणि नितीन राठोड या महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांचा समावेश आहे.

दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान संजय राजपूत हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथले आहेत. तर शहीद नितीन राठोड हे बुलढाण्यातीलच लोणार तालुक्यातील आहेत. या जवानांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर त्यांच्या गावी मोठा आक्रोश करण्यात आला.

VIDEO : Pulwama दहशतवादी हल्ल्याचा घटनाक्रम

First published:

Tags: Terror attack