'पाकिस्ताननं देखील केला होता एअर स्ट्राईक'; काँग्रेसच्या या मुख्यमंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

'पाकिस्ताननं देखील केला होता एअर स्ट्राईक'; काँग्रेसच्या या मुख्यमंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

पाकिस्ताननं देखील एअर स्ट्राईक केला होता असं विधान काँग्रेसच्या नेत्यानं आणि राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयानं केल्यानं नवा वाद निर्माण झाला आहे.

  • Share this:

जयपूर, 17 एप्रिल : 'गुजरातच्या निवडणुका जवळ आल्या होत्या त्यावेळी भाजपला गुजरातमध्ये यश येणार नाही, अशी भीती वाटत होती. त्यामुळे जातीय समीकरणं जुळवण्यासाठी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवण्यात आलं आणि लालकृष्ण अडवाणींना हे पद मिळालं नाही', असं वादग्रस्त विधान राहुल गांधी निकटवर्तीय आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलं.

दरम्यान, या वक्तव्यावरून झालेला वाद शमतो न शमतो तोच गेहलोत यांनी पाकिस्ताननं देखील एअर स्ट्राईक केला होता. पण, त्यांच्याकडून याबद्दल कोव्हाही कोणतंही वक्तव्य केलं गेलं नाही असं म्हटल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. प्रत्येक पंतप्रधानाच्या कार्यकाळात एअर स्ट्राईक करण्यात आला. पण, त्यावर कुणी काहीही बोललं नाही. पण, भाजपकडे सध्या कोणतेही मुद्दे नसल्यानं ते आता एअर स्ट्राईकच्या मुद्यावर ओरडत असल्याचं गेहलोत यांनी म्हटलं आहे.


राष्ट्रपतींची जात काढल्याने वाद पेटला, अशोक गेहलोत यांचं आक्षेपार्ह विधान


वादांची मालिका

यापूर्वी देखील विरोधकांकडून एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी ठार झाले याचे पुरावे मागण्यात आले होते. तसेच सरकारवर टीका देखील करण्यात आली होती.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान गेहलोत यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता आरोप – प्रत्यारोपांना आणखीन जोर चढणार हे नक्की! यापूर्वी देखील नवज्योत सिंग सिद्धू, सॅम पित्रोदा यांनी केलेल्या विधानांवरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर गेहलोत यांच्या विधानामुळे त्यात आणखी भर पडली आहे. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथे एअर स्ट्राईक करत 200 ते 300 जवानांचा खात्मा केला होता. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे.


VIDEO : 'चोर की पत्नी', प्रियांका गांधीबद्दल उमा भारतींचं वादग्रस्त वक्तव्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 04:29 PM IST

ताज्या बातम्या