पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची पत्रकारांनी काढली लाज VIDEO व्हायरल

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची पत्रकारांनी काढली लाज VIDEO व्हायरल

पाकिस्तानात माध्यमांची गळचेपी होत असताना तुम्ही कुठल्या तोंडाने माध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत बोलत आहात असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला.

  • Share this:

लंडन 12 जुलै : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी हे शुक्रवारी लंडनमध्ये एका कार्यक्रमात सहभागी व्हायला गेले, मात्र तिथे त्यांची पत्रकारांनी लाजच काढली त्यामुळे त्यांना अपमानास्पद स्थितीला तोंड द्यावं लागलं. 'माध्यमांचं स्वातंत्र'या विषयावरच्या एका परिसंवादात सहभागी व्हायला कुरेशी हे लंडनमध्ये आले होते. ते कार्यक्रमस्थळी आल्यावर सर्व खुर्च्या रिकाम्याच होत्या. फक्त काही मोजके पत्रकार उपस्थित होते. त्यांनीच प्रश्न विचारून कुरेशी यांना भंडावून सोडलं.

पाकिस्तानात माध्यमांची गळचेपी होत असताना तुम्ही कुठल्या तोंडाने माध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत बोलत आहात असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. पाकिस्तानी लष्कर माध्यमांवर बंधन आणतं, विरोधी पक्षाच्या नेत्यांना वाईट वागणूक दिली जाते असं असताना तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे का?असा थेट प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला, त्यावेळी त्यांची चांगलीच भंबेरी उडाली.

TVS ने लाँच केली पेट्रोल किंवा वीजेशिवाय चालणारी नवी इको फ्रेंडली बाईक

कॅनडाचे पत्रकार लेवेंट यांनी तर त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीच केली. ईशनिंदेच्या आरोपांवरून लेवेंट यांचं एक ट्विट ट्विटरने तक्रारीवरून डिलीट केलं होतं. त्यानंतर पाकिस्तानी सरकारनं त्यांचं अकाऊंट ब्लॉक केलं होतं. त्यावर लेवेंट चांगलेच भडकले. तुम्हाला विचार स्वातंत्र मान्य नाही. माझ्या विचार स्वातंत्र्यावर बंधनं आणणारे तुम्ही कोण आहात असा सवाल त्यांनी केला. यानंतर कुरेशी यांनी थातूर मातूर उत्तरं देत तिथून काढता पाय घेतला.

राहुल गांधींचे वकील म्हणाले, '50 हजार नको प्लीज, 15 हजारांत जामीन करा'

पाकिस्तानी पत्रकार मुर्तझा सोलंगी यांनीच आपल्या ट्विटरवरून दोन व्हिडिओ पोस्ट करून कुरेशी यांच्यावर टीका केलीय. इम्रान खान यांच्याप्रमाणेच कुरेशी यांनाही रिकाम्या खुर्च्यांसमोर बोलण्याचा अनुभव आहे अशी खोचक टीका त्यांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pakistan
First Published: Jul 12, 2019 09:56 PM IST

ताज्या बातम्या