UNमध्ये पाकिस्तानने सत्य स्वीकारलं; काश्मीर भारतातील राज्य-पाक परराष्ट्र मंत्री

UNमध्ये पाकिस्तानने सत्य स्वीकारलं; काश्मीर भारतातील राज्य-पाक परराष्ट्र मंत्री

अखेर पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीर हे भारतातील राज्य असल्याचे मान्य केले.

  • Share this:

जिनिव्हा, 10 सप्टेंबर: जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असे भारताने अनेक वेळा सांगितले. जगातील सर्व देशांनी देखील हे मान्य केले आहे. असे असताना पाकिस्तान मात्र काश्मीरचा उल्लेक भारत व्याप्त काश्मीर असा करत होता. पण अखेर पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीर हे भारतातील राज्य असल्याचे मान्य केले.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी(Shah Mehmood Qureshi) यांनी संयुक्त राष्ट्र संघात(United Nations) बोलताना काश्मीर (Kashmir)हा भारताचा अंतर्गत भाग असल्याचे म्हटले. काश्मीर संदर्भात बोलताना कुरैशी म्हणाले इंडियन स्टेट जम्मू-काश्मीर (Indian State Jammu-Kashmir) याचाच अर्थ भारतातील राज्य जम्मू-काश्मीर असा होय. कुरैशी यांच्या या वक्तव्यामुळे जे सत्य जगाने मान्य केले आहे. पण पाकिस्तान नेहमी फेटाळत होता तो देखील त्यांनी मान्य केला आहे.

चूक लक्षात आल्यानंतर केले आरोप

काश्मीर हे भारतातील राज्य असल्याचे सांगितल्यानंतर कुरैशी यांना त्यांची चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तातडीने भारतावर आरोप करण्यास सुरुवात केली. काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. भारताला वर्तमान सीमा बदलायच्या असल्याचा आरोप त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 04:32 PM IST

ताज्या बातम्या