Article 370 : मोदींच्या मास्टरस्ट्रोकला घाबरला पाकिस्तान, हा घेतला मोठा निर्णय

Article 370 : मोदींच्या मास्टरस्ट्रोकला घाबरला पाकिस्तान, हा घेतला मोठा निर्णय

काश्मीरमधलं कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारत सरकारच्या विरोधात चांगलाच कांगावा सुरू केला होता. आता तर पाकिस्तान सरकारने भारतीय राजदूतांना इस्लामाबादहून परत पाठवलं आहे. त्याचबरोबर आपल्या राजदूतांनाही पाकिस्तानात परत बोलवलं आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 7 ऑगस्ट : काश्मीरमधलं कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारत सरकारच्या विरोधात चांगलाच कांगावा सुरू केला होता. आता तर पाकिस्तान सरकारने भारतीय राजदूतांना इस्लामाबादहून परत पाठवलं आहे. त्याचबरोबर आपल्या राजदूतांनाही पाकिस्तानात परत बोलवलं आहे.पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली. यामध्ये भारताशी राजनैतिक संबंध कमी करण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.भारताशी व्यापारी संबंध कमी करणार असल्याचंही पाकिस्तानने जाहीर केलं आहे.

आधी दिली होती युद्धाची धमकी

काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द झाल्यानंतर पाकिस्तान चांगलाच हडबडला आहे. याआधी, पाकिस्तानने भारत सरकारला युद्धाची धमकी दिली होती.भारत काश्मीरला फिलिस्तान बनवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप पाकिस्तानने केला होता. भारताला काश्मीरची लोकसंख्या बदलायची आहे, असंही पाकिस्तानी नेत्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानी सरकारमधले एक मंत्री आणि इम्रान खान यांचे जवळचे नेते फवाद चौधरी म्हणाले की, भारत सरकारच्या या निर्णयाला रक्त, अश्रू आणि घामाने उत्तर द्यावं लागेल.आपल्याला युद्धासाठी तयार राहणं गरजेचं आहे.

VIDEO : मोदी सरकारचे 'जेम्स बाँड' काश्मिरी जनतेशी साधतायत संवाद

दरम्यान, काश्मीरमध्ये संचारबंदी असतानाही निदर्शनं करणाऱ्या एका आंदोलकांचा मृत्यू ओढवला. पोलिसांचा पाठलाग चुकवण्यासाठी या निदर्शकाने नदीत उडी घेतली.काश्मीरच्या पोलिसांनी आतापर्यंत 100 जणांना अटक केली आहे. यामध्ये राजकीय नेत्यांचाही समावेश आहे.मोदी सरकारच्या निर्णयानंतर आता काश्मीरमधलं जनजीवन हळूहळू पूर्ववत होऊ लागलं आहे. काश्मीरमध्ये शांतता असली तरी पाकिस्तान मात्र एकेक कुरापती काढतो आहे.

=============================================================================================

VIDEO : सुषमा स्वराज यांना अखेरचा निरोप देताना अडवाणींसह भाजप नेते गहिवरले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 7, 2019 08:10 PM IST

ताज्या बातम्या