भारताने पाक उप उच्चायुक्तांना बजावला समन्स

भारताने पाक उप उच्चायुक्तांना बजावला समन्स

भारत आणि पाकिस्तान सीमारेषेवर तणाव वाढला आहे. भारताने आता पाकिस्तानचे उपउच्चायुक्त सय्यद हैदर शाह यांना समन्स बजावला आहे.

  • Share this:

27 फेब्रुवारी : भारत आणि पाकिस्तान सीमारेषेवर तणाव वाढला आहे. भारताने आता पाकिस्तानचे उपउच्चायुक्त सय्यद हैदर शाह यांना समन्स बजावला आहे.

पाकिस्तानचे उप उच्चायुक्त सय्यद हैदर शाह यांना केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयामध्ये बोलवण्यात आलं होतं. पाकमध्ये अटक करण्यात आलेल्या वैमानिकांच्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आले आहे. सय्यद हैदर शाह उपायुक्तांना समन्स करताना ही माहिती लवकरात लवकर देण्याची सूचना दिली आहे.


बुधवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास परराष्ट्र मंत्रालयाने उप उच्चायुक्त सय्यद हैदर शाह यांना बोलावले होते. त्यानंतर शाह हे साउथ ब्लॉकमध्ये पोहोचले होते. भारताने पुलवामा हल्ल्याबद्दल आणि बेपत्ता पायलट बदली माहिती देण्याचे कळवले आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक व्हिडिओ संदेश देत भारतापुढे चर्चेचा प्रस्ताव मांडला. 'युद्धाने कुठल्याही देशाचं भलं झालं नाही. युद्धाचा शेवट हा विनाशच असतो असं सांगत त्यांनी पाकिस्तानने आज सकाळी केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचं समर्थन केलं.

परंतु, इम्रान खान यांचा हा व्हिडिओ एडिट करून लावण्यात आला होता. टपाकिस्तानला कुठल्या नागरी किंवा लष्करी तळावर हल्ला करायचा नव्हता तर फक्त आपली शक्ती दाखवायची होती, असंही ते म्हणाले. भारताचे दोन पायलट आमच्या ताब्यात आहेत. असा दावाही इम्रान खान यांनी केला. पुलवामा हल्ल्यानंतर आम्ही पुरावे देण्याची मागणी केली होती. मात्र भारताने पुरावे दिले नाही, उलट पाकिस्तानच्या हद्दीत येवून हल्ले केले.

भारताची भूमिका

भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पाकिस्तानचे सर्व दावे फेटाळून लावत त्यांनी भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

काय म्हणाले रवीश कुमार?

"सोमवारी भारताने जैश ए मोहम्मदच्या तळावर हल्ला करत तो तळ नष्ट केला. भारताची ही दहशतवादाविरोधातली कारवाई होती. आज पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याला चोख उत्तर देत भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले आहे. पाकिस्तानच्या हद्दीत हे विमान पाडण्यात आले. या हवाई भारताने मीग 21 हे विमान गमावले आहे. यात विमानाचा पायलट बेपत्ता असून त्याचा शोध आम्ही घेत आहोत." अशी माहिती परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी दिली."

======================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 06:13 PM IST

ताज्या बातम्या