लडाखच्या सीमेजवळ पाकिस्तानची लढाऊ विमानं, आगळीक केली तर खबरदार!

लडाखच्या सीमेजवळ पाकिस्तानची लढाऊ विमानं, आगळीक केली तर खबरदार!

भारताय लष्कर आणि हवाई दलही सज्ज असून या पाकिस्तानच्या सर्व गोष्टींवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. पाकिस्तानने काही आगळीक केलीच तर त्याला चोख उत्तर देण्याची हवाई दलाची तयारी आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 11 ऑगस्ट :  केंद्र सरकारने कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानात खळबळ माजलीय. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकाही देशाने पाठिंबा दिला नाही. त्यानंतर पाकिस्तान आता लडाख सीमेजवळ लढाऊ विमाने तैनात करत असल्याची माहिती पुढे आलीय. भारतीय सुरक्षा संस्था आणि गुप्तचर यंत्रणांची पाकिस्तानच्या हालचालींवर करडी नजर असून लष्कर आणि हवाई दलाला अलर्ट करण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तर पाक संसदेच्या संयुक्त सत्रात बोलताना सरळसरळ युद्धाची धमकीच दिली होती. त्यानंतर  लडाख सीमेजवळच्या स्कर्दू भागात Pakistan Air force पाकिस्तान जमवाजमव करत असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. तर काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातले पत्रकार हमीद मीर यांनीही एक ट्विट करत पाकिस्तानी सैन्य सीमेजवळ साधन सामुग्री पोहोचवित असल्याचं म्हटलं होतं.

जम्मू काश्मीर मुस्लिम बहुल असल्यानेच '370' हटवलं, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार भारताय लष्कर आणि हवाई दलही सज्ज असून या पाकिस्तानच्या सर्व गोष्टींवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. पाकिस्तानने काही आगळीक केलीच तर त्याला चोख उत्तर देण्याची हवाई दलाची तयारी असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

इम्रान खान यांची टीका

काश्मीरच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्याचे पाकिस्तानचे सर्व प्रयत्न फसले आहेत. पाकला एकही देशाने उघडपणे पाठिंबा दिला नाही. पाकचा खास मित्र असलेल्या चीन आणि सौदी अरेबियानेही उघडपणे पाठिंबा व्यक्त केला नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तान एकटा पडलाय. त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटरवर थयथयाट करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केलीय. काश्मीरचा प्रश्न चिघळण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघच जबाबदार असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

प्रेग्नंट तरुणीवर 11 वेळा गँगरेप, बॉयफ्रेंडसमोरच अत्याचार, त्याचीही आत्महत्या

इम्रान खान यांनी दोन ट्विट करत संघावर टीका केली. संघ हिंदुत्वाची विचासरणी थोपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे काश्मीरमधली परिस्थिती चिघळली असून तिथल्या संचारबंदीला तीच विचारसरणी जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. काश्मीरमध्ये अत्याचार आणि दडपशाही होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

First published: August 12, 2019, 6:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading