मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिजची चौकशी; UN अधिकाऱ्यांना पाक बंदी

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिजची चौकशी; UN अधिकाऱ्यांना पाक बंदी

पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा जगासमोर आला असून त्यामुळे आता दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानची भूमिका काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 8 मार्च : जमात उल दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला आता पाकिस्तान पाठिशी घालताना दिसत आहे. कारण, हाफिज सईदच्या चौकशीसाठी UNचे अधिकारी पाकिस्तानमध्ये येऊ इच्छित होते. पण, पाकिस्ताननं त्यांना व्हिसा नाकारला आहे. त्यामुळे दहशतवादावर पाकिस्तानची भूमिका काय? पाकिस्तान हाफिज सईदला का वाचवतंय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलायला सुरूवात केली आहे. त्यानंतर आपलं नाव दहशतवाद्यांच्या यादीतून हटवावं यासाठी हाफिज सईदनं संयुक्त राष्ट्रसंघामध्ये वकिलामार्फत आपली बाजू मांडली होती. पण, संयुक्त राष्ट्रसंघानं मात्र त्याला स्पष्ट नकार दिला आहे.

हाफिज सईदबाबत पाकिस्ताननं घेतलेली भूमिका बरंच काही सांगून जाते. त्यामुळे आम्ही दहशतवादाला पोसत नाही असा दावा करणाऱ्या पाकिस्ताचा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.

अयोध्याप्रकरणी मध्यस्थाची नेमणूक होणार? आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

पाकिस्तानचा कारवाईचा देखावा

पाकिस्तानात बंदी असलेल्या जमात उल दवा या संघटनेच्या मुसक्या आवळायला स्थानिक पंजाब सरकारने सुरुवात केलीय. सरकारने जमात आणि त्यांची दुसरी संघटना फलाह ए इन्सानियत या संघटनेच्या मुख्यालयावर ताबा मिळवला आहे. तर त्यांच्याशी संबधित मदरसे आणि मशिदींवरही त्यांनी ताबा मिळवला आहे.

हाफिज सईद हा लष्करे ए तोयबाचा संस्थापक आहे. या दहशतवादी संघटनांवर बंदी घातल्यानंतर त्याने जमात उल दवा आणि फलाह ए इन्सानियत या दोन संघटना तयार केल्या होत्या. या सामाजिक संघटना असल्याचं सांगून तो दहशतवादासाठी पैसा गोळा करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

जम्मूमधील ग्रेनेड हल्ल्यातील मृतांची संख्या दोनवर

भारताच्या प्रयत्नांना यश

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवादाचा सामना करण्यासाठी कठोर पावलं उचलली. भारताला त्यामध्ये यश देखील आलं. अखेर दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिकेला अमेरिका, चीन, फ्रान्स आणि ब्रिटननं देखील पाठिंबा दिला. दहशतवाद्यांच्या या यादीमध्ये हाफिज सईद, मसूद अझहर यांची देखील नावं आहे.

पेस्ट कन्ट्रोल करताना सावधान, पुण्यात दोघांनी गमावला जीव!

First published: March 8, 2019, 10:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading