इस्लामाबाद, 27 मे : पाकिस्तानातील ऐतिहासिक गुरु नानक महालाचा काही भाग समाजकंटकांनी पाडला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, महालात लावलेल्या महागड्या खिडक्या आणि दरवाजे तोडून ते विकण्यात आले. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात हा गुरुनानक महाल आहे.
पाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्राने म्हटलं की, चार मजली बिल्डिंगवर शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांचे फोटो आहेत. हा महाल 400 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. इथं भारतासह परदेशातून लाखो पर्यटक भेट देतात.
लाहोरपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या नारौवल शहरात हा महाल आहे. यात एकूण 16 खोल्या असून प्रत्येक खोलीला तीन दरवाजे लावण्यात आले आहेत. या महालाच्या शेजारच्या गावात राहणाऱ्या मोहम्मद अस्लम यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी या ठिकाणी कॅनडाचे एक शिष्टमंडळ आलं होतं. त्यांच्यासोबत महिलासुद्धा होती. ते सर्व इथं येऊन खुश होते.
Oh it must be Modi sb demolishing historical places of minorities in Pakistan:
— Mahesh Dutt (@m__dutt) May 27, 2019
Historical Guru Nanak palace’ partially demolished by locals in Narowal
https://t.co/QzGa0gNP07
डॉन वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, या महालावर कोणाची मालकी आहे? याची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी कोणाची आहे याबद्दल काहीच स्पष्ट झालेलं नाही.
SPECIAL REPORT: काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी?