दहशतवादी मसूदसाठी पाकची प्रवक्तेगिरी, म्हणे जैशनं पुलवामाची जबाबदारी स्वीकारली नाही

दहशतवादी मसूदसाठी पाकची प्रवक्तेगिरी, म्हणे जैशनं पुलवामाची जबाबदारी स्वीकारली नाही

''पाकिस्तानचे सरकार बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या संपर्कात आहे. त्याच्यासोबत संवादाची प्रक्रिया सुरू आहे'', अशी माहिती महमूद कुरेशी यांनी दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 मार्च : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर कुरापती पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढत आहे. या सर्व घडामोडींदरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांनी बीबीसीला मुलाखत दिली. यामध्ये जैशनं पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसल्याचं वक्तव्य कुरेशी यांनी केलं. त्यामुळे यातून दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'ची पाठराखण करत असल्याचे दिसून येत आहे. यावरून कुरेशींवर सर्व स्तरातून कडाडून टीका केली जात आहे.

''पाकिस्तानचे सरकार बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या संपर्कात आहे. त्याच्यासोबत संवादाची प्रक्रिया सुरू आहे'', अशी माहिती महमूद कुरेशी यांनी दिली आहे. यापूर्वी कुरेशी यांनी अशी कबुली दिली होती की, जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर पाकिस्तानातच असून तो आजारी आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याची जबाबदारी 'जैश-ए-मोहम्मद'नं स्वीकारली. यासंदर्भात महमूद कुरेशी यांना मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा क्षणाचा विलंब न लावता त्यांनी म्हटलं की, संबंधित हल्ला जैश-ए-मोहम्मदनं केला नाही. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या जबाबदारीवरून गोंधळाची परिस्थिती आहे. आमच्या माणसांनी जैशच्या प्रमुख नेतृत्वासोबत संपर्क साधला त्यावेळेस त्यांनी हल्ल्या केल्याचे नाकारले.

मसूदविरोधातील पुरावे पाकिस्तानकडे सुपूर्द

भारत सरकारने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा आरोपी आणि जैश-ए-मोहम्मद म्होरक्या मसूद अझहरविरोधातील सर्व पुराव्यासंहीत पाकिस्तानला डॉजियर सोपवले आहे.

Loading...

याव्यतिरिक्त संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनं मसूदला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्तावही दिला आहे. या प्रस्तावावर पुढील 10 दिवसांमध्ये निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झालेत. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या(सीआरपीएफ)ताफ्यावर हा भ्याड हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळेस सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.अभिनंदन यांचा मायभूमीत परतण्याचा पहिला VIDEO


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 12:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...