News18 Lokmat

कुलभूषण जाधवांच्या फाशीबाबात कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही - पाकिस्तान

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2017 01:36 PM IST

कुलभूषण जाधवांच्या फाशीबाबात कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही - पाकिस्तान

14 एप्रिल :  हेरगिरी प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारताच्या कुलभूषण जाधवबाबात कुठल्याही दबावाला बळी पडणार नसल्याचं पाकिस्ताननं स्पष्ट केलं आहे.

कुलभूषण जाधव प्रकरणी भारताने मोठा दबाव आणल्यानंतर पाकिस्तानमध्ये त्याच्या हालचाली दिसून आल्या. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या मुद्द्यावर काय भूमिका घ्यायची? यावर पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्य बैठकी झाली. या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांच्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

या बेठकीनंतर, जाधव हे भारताची गुप्तचर संस्था 'रॉ'चे हेर आहेत. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं असं पाककडून सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानकडे जाधव यांच्याबाबत ठोस पुरावे आहेत. जाधव यांनी दहशतवादी कारवायात सामील असल्याचं कबुल केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं

दरम्यान, कुलभूषण जाधव यांची भारतानं वेळोवेळी माहिती मागितलीय पण पाकनं अशी कुठलीही माहिती देण्यासही नकार दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2017 01:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...