Samjhauta Express : 'ड्रायव्हरला पाठवून ट्रेन घेऊन जा,' पाकिस्तानचा आडमुठ्ठेपणा

अटारी आंतरराष्ट्रीय रेल्वे स्टेशनचे अधीक्षक अरविंदकुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधून समझौता एक्सप्रेस भारतात येणं अपेक्षित होतं पण भारतीय रेल्वेने आपला ड्रायव्हर आणि कर्मचाऱ्यांना पाठवून समझौता एक्सप्रेस सीमेवरून घेऊन जावी, असा संदेश आला.

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2019 04:38 PM IST

Samjhauta Express : 'ड्रायव्हरला पाठवून ट्रेन घेऊन जा,' पाकिस्तानचा आडमुठ्ठेपणा

दिल्ली, 8 ऑगस्ट : भारतातल्या उच्चायुक्तालयांना परत पाठवल्यानंतर पाकिस्तानने आता समझौता एक्सप्रेस रद्द केली आहे. पाकिस्तानमधून भारतात येणारी ट्रेन आलीच नाही. त्यामुळे समझौता एक्सप्रेसचे प्रवासी अटारी सीमेवर अडकून पडले. भारताने मात्र याबद्दल अजून अधिकृत माहिती दिलेली नाही. पण पाकिस्तानने या ट्रेनचा ड्रायव्हर आणि गार्डला ट्रेन सुरू न करण्याच्या सूचना दिल्या, अशी माहिती आहे.

आणि ट्रेन आलीच नाही

अटारी आंतरराष्ट्रीय रेल्वे स्टेशनचे अधीक्षक अरविंदकुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधून समझौता एक्सप्रेस भारतात येणं अपेक्षित होतं. पण भारतीय रेल्वेने आपला ड्रायव्हर आणि कर्मचाऱ्यांना पाठवून समझौता एक्सप्रेस सीमेवरून घेऊन जावी, असा संदेश आला. पाकिस्तानने रेल्वेसुरक्षेच्या कारणासाठी हा निर्णय घेतला असं त्यांचं म्हणणं आहे.आता भारतीय रेल्वेचे ड्रायव्हर आणि ज्यांच्याकडे व्हिसा आहे अशा कर्मचाऱ्यांना समझौता एक्सप्रेस आणण्यासाठी पाठवलं जाणार आहे.

सरकारकडून विंग कमांडर अभिनंदन यांचा वीर चक्र पुरस्कारनं होणार सन्मान?

याआधी पाकिस्तानने भारताशी संबंध तोडल्याचं जाहीर केलं होतं. तसंच भारताला युद्धाची धमकीही दिली होती. पाकिस्तानने भारताच्या विमानांना आपल्या हवाई हद्दीत येण्याची परवानगीही नाकारली आहे.

Loading...

भारतीय चित्रपटांवरही बंदी

पाकिस्तानने भारताशी व्यापारविषयक संबंध तोडल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहम्मूद कुरेशी यांनी टीव्हीवरून जाहीर केलं. पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट दाखवण्यावरही इम्रान खान यांच्या सरकारने बंदी घातली आहे.

पाकिस्तानने काश्मीरबद्दलच्या निर्णयावर टोकाच्या प्रतिक्रिया देऊ नयेत, अशा सूचना संयुक्त राष्ट्रांनी दिल्या आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला उद्देशून भाषण करणार आहेत. काश्मीरमधलं कलम 370 रद्द करणं आणि काश्मीरच्या विभाजनाबद्दल पंतप्रधान या भाषणात भारताची भूमिका मांडतील, अशी अपेक्षा आहे.

======================================================================================================

सांगलीत गर्भवती महिलेचं LIVE रेस्क्यू ऑपरेशन, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 03:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...