पाकचा फेकूपणा सुरूच, म्हणे, 'आमच्या फायटर जेटने सियाचीनवरुन केलं उड्डाण'

पाकचा फेकूपणा सुरूच, म्हणे, 'आमच्या फायटर जेटने सियाचीनवरुन केलं उड्डाण'

  • Share this:

24 मे : भारतीय लष्कराने मंगळवारी सीमारेषेवरील पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्याचा व्हिडीओ जाहीर केल्यापासून पाकिस्तानात अस्वस्थतता निर्माण झाली आहे. पाकिस्तानने आज (बुधवारी) सियाचिनजवळ स्कर्दू भागात पाक सैन्याच्या लढाऊ विमान उडवल्याचा दावा केला आहे. मात्र, भारतीय हवाईदलाने पाकिस्तानचा हा दावा फेटाळला आहे. भारतीय हद्दीतून अशा कोणत्याही लढाऊ विमानाचं उड्डाण झालं नसल्याचं हवाईदलाने स्पष्ट केलं आहे.

पाकिस्तानी वायुसेनेने 'मिराज' हे फायटर जेट विमान सियाचिनजवळ स्कर्दू भागात  उडवल्याचा दावा केला आहे. या विमानात पाकिस्तानचे हवाईदल प्रमुख असल्याचंही पाकने म्हंटलं आहे. मात्र, भारतीय हवाई दलानं या वृत्ताचं खंडन केलं आहे. आता या दोन्ही दाव्यांमध्ये नक्की कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे शोधून काढणं महत्त्वाचं ठरणारे.

भारतीय लष्कराने मंगळवारी एक व्हिडिओ जारी करून सैन्याने नौशेरा आणि नौगाम सेक्टरमधील पाकिस्तानच्या चौक्या उद्धवस्त केल्याचं जाहीर केलं. पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेले शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरीविरोधात दिलेले प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचंही भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं होतं. भारतीय लष्कराने या ऑपरेशनमध्ये रॉकेट लाँचर, अँटी टँक मिसाइल आणि ऑटोमॅटिक शस्त्रास्त्रांचा वापर केला होता.

आता भारताच्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानननं एका बनावट व्हिडीओ प्रसिद्ध केलाय. त्यात पाकने स्वत:चीच ठाणी उद्धवस्त केलीत काल नवशेरातला व्हिडीओ भारतानं प्रसिद्ध केल्यानंतर लगेगच पाकिस्तानने भारतीय ठाणी उद्ध्वस्त केल्याचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.

First published: May 24, 2017, 3:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading