भारतीय गुप्तहेराच्या अटकेचा पाकिस्तानचा दावा, Lux Cozi अडंरवेअरचा दिला पुरावा

अटक केलेल्या माणसाने घातलेली अंडरवेअर ही Lux Cozi कंपनीची होती ही कंपनी भारतीय आहे त्यामुळे राजू हा भारताचा हेर असल्याचा दावा पाक पोलिसांनी केलाय.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 09:42 PM IST

भारतीय गुप्तहेराच्या अटकेचा पाकिस्तानचा दावा, Lux Cozi अडंरवेअरचा दिला पुरावा

इस्लामाबाद 1 ऑगस्ट : भारताच्या एका गुप्तहेराला अटक केल्याचा दावा पाकिस्तानी पोलिसांनी केला आहे. पंजाबमधल्या डेरा गाजी खान जिल्ह्यातल्या राखी गज या भागातून या गुप्तहेराला अटक करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. राजू लक्ष्मण असं या गुप्तहेराचं नाव आहे. अटक केलेल्या माणसाने घातलेली अंडरवेअर ही Lux Cozi कंपनीची होती ही कंपनी भारतीय आहे त्यामुळे राजू हा भारताचा हेर असल्याचा दावा पाक पोलिसांनी केलाय.

याबाबतचं वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दिलं आहे. पंजाब प्रांतात असलेल्या न्यूक्लिअर प्लांटमधली माहिती काढण्याचा राजूचा प्रयत्न होता. बलुचिस्तानमधून  डेरा गाजी खान या भागात प्रवेश करण्याचा राजूचा प्रयत्न होता असा दावा पोलिसांनी केलाय. याच भागातून कुलभूषण जाधव यांनाही अटक करण्यात आली होती असं पाकिस्तानने म्हटलं आहे.

IIPS च्या प्रोजेक्ट ऑफिसरसाठी भरती, 'असा' करा अर्ज

राजू लक्ष्मण याला पाकिस्तानने चौकशीसाठी अज्ञात ठिकाणी नेलं असल्याचं सांगितलं जातंय. अटक केलेला मनुष्य हा भारतीय गुप्तहेर आहे हे दाखविण्यासाठी जो अंडरवेअरचा पुरावा दिला गेला त्यावरून सोशल मीडियावर पाकिस्तानची खिल्ली उडवलीय जातेय. केवळ भारतीय कंपनीची अंडरवेअर घातली म्हणून तो गुप्तहेर कसा काय असू शकतो असा प्रश्न आता विचारण्यात येतोय.

पाहा VIDEO : वॉटरपार्कमध्ये आली 'त्सुनामी'सारखी लाट, 44 जण जखमी

Loading...

पाकिस्तानात हेरगिरीसाठी फाशीच्या शिक्षेचे तरदूत असून याआधी कुलभूषण जाधव यांनाच अशाच प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र पाकिस्तानने जाणीवपूर्वक जाधव यांना अटकवलं असा दावा भारताने केलाय. तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानचा दावा फेटाळत कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 09:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...