पाकिस्तान झुकलं; भारतासाठी खुली केली एअरस्पेस!

पाकिस्तानने सर्व नागरिक उड्डाणांसाठी एअरस्पेस खुली केली आहे. फेब्रुवारी महिन्यात बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकने बंदी घातली होती.

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2019 11:52 AM IST

पाकिस्तान झुकलं; भारतासाठी खुली केली एअरस्पेस!

नवी दिल्ली/ कराची, 16 जुलै: पाकिस्तानने सर्व नागरिक उड्डाणांसाठी एअरस्पेस खुली केली आहे. फेब्रुवारी महिन्यात बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकने बंदी घातली होती. त्यानंतर भारताच्या कोणत्याच विमानांना पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करता येत नव्हता. यासंदर्भात पाकिस्तानच्या नागरी हवाई उड्डाण प्राधिकरणाने रात्री 12.41 वाजता एक नोटीस जारी केली आहे. या नोटीसमध्ये पाकिस्तानचे हवाई क्षेत्र सर्व नागरी विमानांसाठी खुले करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानचे हवाई क्षेत्र एक महत्त्वाचा हवाई मार्ग आहे. या मार्गावरून दिवशभरात हजारो प्रवासी आणि मालवाहतूक करणारी विमाने प्रवास करत असतात. पण पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने त्यांची एअरस्पेस बंद केली होती. त्याचा थेट परिणाम अनेक विमान कंपन्यांना बसत होता. पाकिस्तानची एअरस्पेस वापरता येत नसल्यामुळे विमानांना दुसऱ्या मार्गाने प्रवास करावा लागत होता. अन्य मार्गाचा वापर करताना इंधन अधिक लागत होते. तसेच खर्च देखील वाढत होता. पाकिस्तानने त्यांची एअरस्पेस बंद केल्याचा फटका त्यांना स्वत:ला बसत होता. पाकिस्तानची एअरस्पेस वापरल्याबद्दल प्रत्येक विमानामागे त्यांना 500 डॉलर मिळत असे. पण त्यांनी स्वत:हून एअरस्पेस बंद केल्यामुळे ही कमाई मिळत नव्हती.

भारताचे झाले नुकसान

काही दिवसांपूर्वी नागरी विमान उड्डयण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेत यासंदर्भात माहिती दिली होती. पाकिस्तानने एअरस्पेस बंद केल्यामुळे 2 जुलैपर्यंत एअर इंडियाला 491 कोटींचा तोटा झाला होता. अमेरिका आणि युरोपला जाणारी सर्व विमाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जात होती. याशिवाय इंडिगो, स्पाइसजेट आणि गो एअर यांना मिळून 60 कोटींचे नुकसान झाले होते.

पाकने ठेवली होती अट

Loading...

26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानने एअरस्पेस बंद केली होती. भारताने बालाकोट येथील दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर हल्ला केला होता. या हल्ल्याच्या 12 दिवश आधी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे आत्मघाती हल्ला केला होता. यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकने अट ठेवली होती की, जोपर्यंत भारत बालाकोट प्रमाणे पुन्हा हल्ला करणार न करण्याचे आश्वासन देत नाही तोपर्यंत एअरस्पेस खुली करणार नाही. पण भारताकडून अशा प्रकारचे कोणतेही आश्वासन दिले गेले नाही. अखेर पाकिस्ताननेच आर्थिक संकटासमोर झुकत एअरस्पेस खुली केली.

मुख्यमंत्रिपदावरून युतीत वादाची ठिणगी; नाशिकमध्ये शिवसेनेकडून पोस्टरबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 11:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...