मराठी बातम्या /बातम्या /देश /

Analysis : अतिरेक्यांना पोसणारा हाच आहे का इम्रान खानचा 'नया पाकिस्तान'

Analysis : अतिरेक्यांना पोसणारा हाच आहे का इम्रान खानचा 'नया पाकिस्तान'

सध्याचा पाकिस्तानाच हा चीनच्या कह्यात गेलेला आहे. शिवाय, पाकमधील स्थितीवर लष्कराचं नियंत्रण असल्यानं भारतानं आता कडक पावलं उचलण्याची गरज आहे.

सध्याचा पाकिस्तानाच हा चीनच्या कह्यात गेलेला आहे. शिवाय, पाकमधील स्थितीवर लष्कराचं नियंत्रण असल्यानं भारतानं आता कडक पावलं उचलण्याची गरज आहे.

सध्याचा पाकिस्तानाच हा चीनच्या कह्यात गेलेला आहे. शिवाय, पाकमधील स्थितीवर लष्कराचं नियंत्रण असल्यानं भारतानं आता कडक पावलं उचलण्याची गरज आहे.

मुंबई, 15 फेब्रुवारी : पाकच्या वाढत्या दहशतवादी कारवाया थांबण्याचं काही नाव घेताना दिसत नाही. पुलवामामध्ये जवानांच्या ताफ्यावर झालेला हल्ला म्हणजे आता 'डोक्यावरून पाणी गेल्याची' प्रतिक्रिया देशातील सर्व स्तरातून पुढे येताना दिसत आहे. या हल्ल्याचा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी निषेध केला. पण, निषेधाचा प्रकार म्हणजे 'देखल्या देवा दंडवत' आहे. कारण, इम्रान खान हे पाक लष्कराच्या हातातील बाहुले आहेत हे आता काही लपून राहिलेलं नाही.

नया पाकिस्तान! पाकमधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इम्रान खान यांनी दिलेला नारा खूपच लोकप्रिय ठरला. पंतप्रधानपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर इम्रान खान यांनी भारताशी संबंध सुधारण्यावर भर असेल अशी ग्वाही दिली. पण, प्रत्यक्षात मात्र वाढत्या दहशतवादी कारवाया आणि पाक लष्कराच्या कुरापती पाहता इम्रान खान यांचा हाच का नया पाकिस्तान? असा प्रश्न निर्माण होतो. शिवाय, पुलवामामधील हल्ल्यानंतर इम्रान खान हे लष्कराच्या हातातील बाहुले असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं.

चीनच्या कह्यात गेलेला नया पाकिस्तान

आजचा पाकिस्तान हा चीनच्या कह्यात गेलेला पाकिस्तान आहे. चीनच्या मदतीनं पाकिस्तान सध्या सिंगयांग ते ग्वाद्वार बंदरापर्यंत रस्ता बांधत आहे. त्याला 'वन बेल्ट, वन नेशन' असं नाव देखील देण्यात आलं आहे. यामध्ये चीननं अब्जावधी रूपयांची गुंतवणूक केलेली आहे. शिवाय, अमेरिकेनं आर्थिक निर्बंध लादल्यानंतर चीननं पाकिस्तानला मोठी आर्थिक गुंतवणूक केलेली आहे. यावर विचारले असता पाकिस्तान विषयाचे अभ्यासक अरविंद गोखले सांगतात की, ‘’पाकिस्तानमध्ये चीननं मोठी आर्थिक गुंतवणूक केलेली आहे. काही वर्षानं पाकिस्तानला हे पैसे परत करायचे आहेत. पण, अमेरिकेसारख्या देशानं आर्थिक निर्बंध लादल्यामुळे  चीननं दिलेली मदत पाकिस्तानसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सध्याचा पाकिस्तान हा चीनच्या कह्यात गेलेला आहे. शिवाय, अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अलिकडील काही विधानं पाहता अमेरिका आर्थिक निर्बंध उठवू शकते की काय? अशी शंका निर्माण होते. त्यामुळे पाकिस्तानला आणखी हातभार लागू शकतो.’’

अतिरेक्यांना मदत सुरुच

पाकिस्तान दहशतवादाचं माहेरघर असल्याचे अनेक पुरावे देत भारतानं पाकिस्तानचा बुरखा आंतरराष्ट्रीय स्तरावर फाडलेला आहे. पण, सध्याची स्थिती पाहता पाकिस्तानात लष्कराचं वर्चस्व असल्याचं दिसून येतं. पाकिस्तानमधील सर्व पैसा हा लष्कर आणि आयएसआय ही गुप्तचर संघटना हाताळते. पाकिस्तानातील आर्थिक व्यवस्थेवर सध्या या दोन्ही संघटनांचं वर्चस्व आहे. ही बाब वेळोवेळी स्पष्ट झालेली आहे. यावर विचारले असता अरविंद गोखले सांगतात की, ‘’सत्ता हातात ठेवायची तर लष्कराच्या विरोधात जावून चालत नाही. लष्कराच्या विरोधात गेल्यास त्याठिकाणी सत्तेत राहता येत नाही. त्यामुळे कधीकाळी लष्करशाहीला विरोध करणाऱ्या इम्रान खान यांना ही गोष्ट चांगली ठावूक आहे. त्याच कारणामुळे आता इम्रान खान लष्कराच्या मर्जीविरोधात जाऊ शकत नाही. भारताविरोधातील कारवायांना लष्कराचा पाठिंबा असतो हा आजवरचा इतिहास आहे. शिवाय, लष्करशाहीला विरोध केल्यानंतर बेनझिर भुत्तो आणि नवाज शरीफ यांचं काय झालं हे सर्वश्रृत आहे.’’

धडा घेणार का?

सध्या देशात पाकविरोधात वातावरण आहे. आत्तापर्यंत भारतानं खूप सहन केलं. आत्ता पाकिस्तानला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी जगभरातील देशांना एकत्र करणं आणि इंदिरा गांधी यांनी ज्याप्रमाणे 1971 साली पाकपासून विभक्त करत बांग्लादेशची निर्मिती केली त्याप्रकारची पावलं उचलण्याची गरज असल्याचा मत प्रवाह देखील आता पुढे येत आहे.

पुलवामातील भ्याड आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्ताविरोधात कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहे. पाकचा 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतलेला. हे पाकला धडा शिकवण्यासाठी उचललेलं एक पाऊल आहे. शिवाय, भरीस भर म्हणून 'युनायटेड युनियननं' देखील पाकिस्तानला काळ्या यादीत टाकलं आहे. त्याचा परिणाम देखील पाकच्या व्यापारावर आणि आर्थिक स्थितीवर होणार आहे. युनायटेड युनियनच्या निर्णायामुळे पाकच्या आर्थिक स्थितीवर आणि व्यापारावर देखील परिणाम होणार आहे.

VIDEO : 'मोस्ट फेवर्ड नेशन' म्हणजे काय?

First published:

Tags: Terror attack