कुरापती सुरूच ! पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, एक जवान शहीद

कुरापती सुरूच ! पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, एक जवान शहीद

पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून भारतानं देखील त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Share this:

श्रीनगर, 18 मार्च : गेल्या काही दिवसांत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सातत्यानं केलं जात आहे. सोमवारी (18 मार्च) पहाटे 5.30 वाजता देखील जम्मू - काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यामध्ये पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यावेळी भारतीय लष्करानं देखील पाकच्या हल्ल्याला जशास तसे उत्तर दिलं. जवळपास 7.15 वाजेदरम्यान गोळीबार थांबवण्यात आला. दरम्यान, पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला असून चार जवान जखमी झाले आहेत.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईकची कारवाई केली. त्यामध्ये जवळपास 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारतानं ही कारवाई केल्यानं पाकिस्तान बिथरला आहे. घाबरलेल्या पाकिस्ताननं एफ-16 विमानांच्या मदतीनं भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. पण, भारतानं पाकिस्तानचा हा प्रयत्न उलथवून लावत पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं.

एअर स्ट्राईकनंतर दोन्ही देशांमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. पाकिस्तानकडून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू असून भारताकडून देखील त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. या पार्श्वभूमीवर सीमेलगत असणाऱ्या गावांमध्ये देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काही गावातील लोकांना यापूर्वी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

...जेव्हा मनोहर पर्रीकरांनी एका झटक्यात 11 रुपयांनी स्वस्त केलं होतं पेट्रोल

दहशतवाद्यांविरोधात देखील मोहीम

दरम्यान, वाढत्या दहशतवादी कारवाया पाहता आता भारतीय लष्करानं देखील दहशतवाद्यांविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू - काश्मीरमध्ये देखील लष्करानं टॉपच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या कारवाईदरम्यान जवानांना सुरक्षेच्या दृष्टीनं देखील काही मार्गदर्शक तत्वे आखून देण्यात आली आहेत. त्यामुळे कारवाई करताना जवान शहीद होणार नाहीत किंवा जखमींचं प्रमाण कमी होईल यावर देखील आता लष्करानं लक्ष केंद्रीत केलं आहे.

VIDEO: पेट्रोल पंपावर तलवारीचा धाक दाखवून केली लूट, घटना सीसीटीव्हीत कैद

First published: March 18, 2019, 8:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading