UNSCमध्ये 'जैश-ए-मोहम्मद'बाबत पाकिस्तान घेणार 'ही' भूमिका

UNSCमध्ये 'जैश-ए-मोहम्मद'बाबत पाकिस्तान घेणार 'ही' भूमिका

  • Share this:

न्यूयॉर्क, 04मार्च : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर कुरापती पाकिस्तानवर जागतिक स्तरावर प्रचंड दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, 'जैश-ए-मोहम्मद'सहीत बंदी घालण्यात आलेल्या सर्व दहशतवादी संघटनांसंदर्भातील आपल्या भूमिकेवरुन पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चक्क यू-टर्न घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC)दहशतवाद्यांच्या यादीमध्ये 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरला नावाचा समावेश करण्याच्या प्रस्तावास पाकिस्तान समर्थन दर्शवण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील वृत्तपत्र 'एक्स्प्रेस  ट्रिब्यून'मध्ये यासंदर्भातील वृत्त देण्यात आले आहे. एकीकडे दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान 'जैश-ए-मोहम्मद'बाबतच्या आपल्या भूमिकेवरुन यू-टर्न घेणार असल्याचे म्हटलं जातं आहे. तर दुसरीकडे,  किडनीच्या आजारामुळे मसूद अझहरचा मृत्यू झाल्याची माहिती गुप्तहेर खात्यातील उच्चस्तरीय सूत्रांकडून 'CNN News18' ला मिळाली. पण पाकिस्तान किंवा 'जैश-ए-मोहम्मद'कडून अद्याप मसूदच्या मृत्यूसंदर्भात अधिकृतरित्या दुजोरा देण्यात आलेला नाही.

मसूद अजहरला आंतराराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी

मसूद अजहरचा ब्लॅक लिस्टमध्ये समावेश करण्यासाठीचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडण्यात आला. बुधवारी अमेरिका, ब्रिटन, आणि फ्रान्सने हा प्रस्ताव मांडला. जैश-ए-मोहम्मद या संघटनेनेच पुलवामा येथे दहशतवादी हल्ला केला, असे या प्रस्तावात म्हटले गेले आहे. मसूज अजहरवर शस्त्रबंदीसह आंतरराष्ट्रीय प्रवासबंदीही करावी तसंच त्याची संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी विनंती अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने या प्रस्तावाद्वारे केली होती.

यासंबंधी एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याच्या हवाल्याने 'एक्स्प्रेस ट्रिब्यून'ने वृत्त दिले आहे की, पाकिस्तानकडून एका निर्णायक धोरणा अंतर्गत बंदी घालण्यात आलेल्या सर्व दहशतवादी संघटना आणि 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरविरोधात कठोर कारवाई केली जाऊ शकते. अझहरविरोधात काय कारवाई करण्यात येईल?, याबाबतची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून मसूद अझहरला आंतराराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावास केलेला आपला विरोध पाकिस्तान मागे घेण्याची शक्यता आहे, असे स्पष्ट संकेतही अधिकाऱ्यानं दिले आहेत. 'केवळ एक व्यक्ती महत्त्वाची आहे की व्यापक राष्ट्रीय हित महत्त्वाचे आहे?, यावर देशाला ठोस निर्णय घ्यावा लागले',अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यानं दिली आहे.

First published: March 4, 2019, 7:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading