S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

AIRSTRIKEनंतर पाकिस्तान घाबरला, बाॅलिवूडवर काढला राग

पाकिस्तानानं भारतीय चित्रपटांवर बंदी टाकली. शिवाय भारतीय जाहिरातीही पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाहीत.

Updated On: Feb 26, 2019 08:50 PM IST

AIRSTRIKEनंतर पाकिस्तान घाबरला, बाॅलिवूडवर काढला राग

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : भारताच्या AIR STRIKEचे पडसाद पाकिस्तानमध्ये उमटू लागलेत. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद हुसेन चौधरी यांनी ट्विट करून पाकिस्तानात एकही भारतीय चित्रपट रिलीज होणार नाही, असं सांगितलंय. शिवाय PEMRA ला भारतीय जाहिरातींविरोधात पाऊल उचलायला सांगितलंय.
याआधी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी कलाकारांवर तर बंदी घातली होतीच, शिवाय अनेक स्टार्सनी शहिदांच्या कुटुंबाला मदतही केली. अनेकांनी भारतीय सिनेमे पाकिस्तानात रिलीज न करण्याचा निर्णय घेतला होताच.हल्ल्यानंतर टोटल धमाल, गली बॉय, लुका छुपी, नोटबुक आणि कबीर सिंह या सिनेमाचं रिलीज पाकिस्तानात नाही करायचा निर्णय झाला होता.

पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय वायु दलाच्या मिराज - 2000 या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय वायुदलानं केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांना पळता भुई थोडी झाली. या हल्ल्यामध्ये 5 पाकिस्तानी सैनिक देखील ठार झाले. तर जखमींवर रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 21 मिनिटं भारतीय हवाई दलानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या तळाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.प्रत्युत्तरादाखल पाकनं भारतीय हवाई दलावर हल्ला केला. पण, भारतीय हवाई दलापुढे त्यांची डाळ शिजली नाही.

- पुलवामा हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर केवळ 100 तासांच्या आतमध्ये भारतानं पुलवामा हल्ल्याचा मास्टर माईंड असलेल्या गाजी राशिद आणि कामरान खात्ना केला होता.

- पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. त्यामुळे पाकिस्तानला व्यापारामध्ये दिलेली सूट बंद झाली.

- मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढल्यानंतर भारतानं पाकिस्तानी वस्तुंवर 200 टक्के कर लावला.

- मोदी सरकारनं रावी नदीवरील पाणी रोखण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शाबपूर

- कांडी याठिकाणी धरणाच्या कामाला सुरूवात देखील झाली आहे. याप्रोजेक्टला नॅशन प्रोजेक्ट म्हणून देखील घोषित करण्यात आलं आहे. मोदी सरकारनं रोखलेलं पाणी आता जम्मू

- काश्मीर आणि पंजाबकडे वळवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली.

- पुलवामा हल्ल्यानंतर भारताला अमेरिका, फ्रान्ससह इस्त्रायलनं देखील पाठिंबा दर्शवला. यानंतर भारतानं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसुदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याकरता प्रस्ताव मांडला. त्याला चीननं देखील पाठिंबा दर्शवला.

- दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय वायू दलानं पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 300पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले.


निसर्गाने नटलेल्या ठिकाणी होते दहशतवादी कॅम्प, पाहा बालाकोटचे कधीही न पाहिलेले PHOTOS

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 08:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close