सियालकोटमध्ये लष्कराच्या हालचालीत वाढ, पाकिस्तानी सेनेने तयार केले टँक- रिपोर्ट

पाकिस्तानातील अनेक पत्रकार आणि सामान्य जनता ट्विटरवर सियालकोट हॅशटॅग करत ट्वीट करत आहेत.

पाकिस्तानातील अनेक पत्रकार आणि सामान्य जनता ट्विटरवर सियालकोट हॅशटॅग करत ट्वीट करत आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, २७  फेब्रुवारी २०१९- भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणावाचं वातावरण तयार झालं आहे. भारताने हल्ला केल्यानंतर या हल्ल्याचं योग्य उत्तर देऊ असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. दरम्यान ट्विटरवर #Sialkot टॉप ट्रेंडमध्ये होता. सियालकोट हे पाकिस्तानातील पंजाब प्रांतात येतं आणि पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी सेनाने सियालकोट बॉर्डरवर टँक तैनात केले आहेत. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पाकिस्तानातील अनेक पत्रकार आणि सामान्य जनता ट्विटरवर सियालकोट हॅशटॅग करत ट्वीट करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी सेना सियालकोट सीमेवर टँक सज्ज करत आहेत. यामुळे येता काळ भारत- पाकिस्तानसाठी कठीण असणार आहे. यात पाकिस्तानचे पत्रकार वजाहत काजमीहेही सामिल आहेत. वजाहत यांनी ट्वीट करून म्हटले की, पाकिस्तान आणि भारताच्या सीमेवर सियालकोट सेक्टरला युद्धाचं स्वरुप आलं आहे. इथे दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार केला जात आहे. तसेच पाकिस्तानकडून वायुसेनेच्या देखरेखीत टँक सज्ज करण्यात आले आहेत. पाकिस्तानी नागरिकांकडून सियालकोट सेक्टर येथे फायटर जेटचे आवाज ऐकू आल्यासंदर्भातले ट्वीट आहेत. मात्र आतापर्यंत कोणत्याही भारतीय किंवा पाकिस्तानी अधिकाऱ्याने याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. सीमेवर गोळीबार गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे काश्मिरातील वातावरण तापलं आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. Army 'इन अॅक्शन', पहाटे दोन दहशतवाद्यांचा खात्मा शोपियानमध्ये भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शोपियानमध्ये पहाटे दहशतवादी आणि लष्करामध्ये बराच वेळ चकमक सुरू होती. या चकमकीत लष्कराने दोन जवानांना कंठस्नान घातलं आहे. भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला अटक केली, पाकिस्तानचा दावा ' आम्ही भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतलं आहे,' असा दावा पाकिस्तानने केला आहे. काही वेळापूर्वी भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला आहे. भारताने पाकिस्तानचं F16 विमान पाडलं भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत- पाकिस्तानच्या एलओसीवर तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. यात दर मिनिटाला नवीन अपडेट येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं आहे. विमानातील सैनिक पॅराशूटमधून उतरताना दिसले. मात्र ते नक्की कोणत्या दिशेला गेले हे अजून कळू शकले नाही. भारतीय हवाई दलाचं विमान कोसळलं, घटनास्थळावरील EXCLUSIVE VIDEO
    First published: