शाहरुख खानवर भडकली पाकिस्तानची सेना, दिली 'ही' प्रतिक्रिया

शाहरुख खानवर भडकली पाकिस्तानची सेना, दिली 'ही' प्रतिक्रिया

शाहरुखने नुकताच वेबसीरिजचा ट्रेलर शेअर केला. याच वेबसीरिजवरून पाकिस्तानची सेना शाहरुखवर भडकली आहे.

  • Share this:

मुंबई, 25 ऑगस्ट : बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान सध्या चर्चेत आला आहे. यावेळी कोणत्या सिनेमामुळे नाही तर पाकिस्तानच्या लष्कराने त्याच्यावर दिलेल्या एका प्रतिक्रियेमुळे शाहरुख चर्चेत आला आहे. काश्मीर प्रश्नावरून शाहरुखवर टीका करत पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी शाहरूखला एक आवाहनही केलं आहे.

शाहरुख खानची एक वेबसीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. शाहरुखने नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर शेअर केला. याच वेबसीरिजवरून पाकिस्तानची सेना शाहरुखवर भडकली आहे.

'शाहरुख तुला बॉलिवूड सिंड्रोम आहे. सत्य जाणून घेण्यसाठी तू रॉचे एजंट कुलभूषण जाधव, विंग कमांडर अभिनंदन आणि 27 फेब्रुवारी 2019 कडे पाहायला हवं. शाहरुख काश्मीरमधील जनतेवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध तू आवाज उठवायला हवा. आरएसएसच्या नाझीवादी हिंदुत्वामुळे या अत्याचारांमध्ये सतत वाढ होत आहे,' असं ट्वीट आसिफ गफूर यांनी केलं आहे.

शाहरुखवर का भडकला पाकिस्तान?

'बार्ड ऑफ ब्लड' ही शाहरुख खानची वेबसीरिज लवकरच रिलीज होणार आहे. या वेबसीरिजमधून भारताच्या धाडसी गुप्तहेरांबद्दल माहिती देण्यात आली आहे. जे पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भारतीय मिशन पूर्ण करतात. या वेबसीरिजमधून पाकिस्तानी सैन्याबद्दल काही धक्कादायक खुलासे करण्यात आल्याचे काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये म्हटलं आहे. त्यामुळे शाहरुखविरोधात पाकिस्तानच्या लष्कराने आक्रमक प्रतिक्रिया दिल्याची चर्चा आहे.

धनंजय मुंडेंच्या लेकीने गाजवली सभा, पाहा हा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: August 25, 2019, 12:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading