भारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश!

भारताच्या दणक्यानंतर घाबरलं पाकिस्तान, सांभाळून राहण्याचे सैनिकांना दिले आदेश!

भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे 5 सैनिक ठार झाले होते.

  • Share this:

इस्लामाबाद 18 जानेवारी : घुसखोरीविरूद्ध भारताने केलेल्या धडक कारवाईनंतर पाकिस्तान हादरून गेलंय. पाकव्याप्त काश्मीर मधल्या सैन्याच्या सर्व तुकड्यांना पाकिस्तान लष्कराने दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सकाळी 10 च्या आधी बाहेर पडू नका. अनावश्यक गोळीबार करू नका असे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुरूवारी भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे 5 सैनिक ठार झाले होते.

पाक व्याप्त काश्मीर मध्ये 3POK ब्रिगेड तैनात आहे. या तुकडीतल्या सर्व जवानांना पाकिस्तानने हे आदेश दिले आहे. गेली दोन दिवस पाकिस्तानचं लष्कर घुसखोरीचा प्रयत्न करत होतं. अतिरेक्यांनी घुसखोरी करायची आणि त्यांना फायरिंग करून बॅकिंग द्यायचं असं कृत्यू पाकिस्तान वारंवार करत असतं. मात्र यावेळी भारताने आक्रमक प्रत्युत्तर देत जोरदार दणका दिला.

सर्जिकल स्ट्राईक नंतरची भारताची ही मोठी कारवाई होती. त्यामुळे पाकिस्तान हादरलं असून आपल्या सैनिकांना संयम राखण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. सीमेवर असणाऱ्या सर्व टेहाळणी चौक्यांवर 10 पेक्षा कमी सैनिक असू नये, सैनिकांनी एकट्याने फिरू नये असेही निर्देश देण्यात आले आहेत.

17 जानेवारीला भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या 5 जवानांना ठार केलं होतं. सीमेवर झालेल्या चकमकीत भारताने चोख प्रत्युत्तर दिलं होतं. पाकिस्तानचे 12 बंकर्सही भारताने उद्धवस्त केले होते.  सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराची ही सर्वात मोठी कारवाई होती. नॉदर्न कमांडचे प्रमुख लेफ्ट. जनरल रणबीर सिंग यांनी माहिती दिली होती.

प्रत्यक्ष ताबारेषेपलीकडून पाकिस्तान शस्त्रसंधीचं वारंवार उल्लंघन करत होता. पाकिस्तानी कारवायांना भारतीय लष्कराने दिलेलं हे चोख प्रत्युत्तर असल्याचंही सिंग म्हणाले.

VIDEO : लष्कराचा पाकिस्तानला पुन्हा दणका, घुसखोरी करणाऱ्या 5 सैनिकांचा खात्मा

First published: January 18, 2019, 8:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading