पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात चिमुरडीचा मृत्यू

पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात चिमुरडीचा मृत्यू

पाकिस्तानी सैन्याने पूँछमध्ये केलेल्या गोळीबारात एका पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू ओढवला. सोबिया शरीफ असं या मुलीचं नाव आहे. सोबियासह १० नागरिकांचा या गोळीबारात मृत्यू ओढवला आहे.

  • Share this:

श्रीनगर, १ एप्रिल : पाकिस्तानी सैन्याने पूँछमध्ये केलेल्या गोळीबारात एका पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू ओढवला. सोबिया शरीफ असं या मुलीचं नाव आहे. सोबियासह १० नागरिकांचा या गोळीबारात मृत्यू ओढवला आहे.

पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे एक अधिकारीही शहीद झाले.तसंच ४ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.

भारतीय सैन्यानेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं.

पाकिस्तानी सैन्याने सोमवारी सकाळी नियंत्रण रेषेवरच्या शाहपूर आणि करनी क्षेत्रात गोळीबार सुरू केला. या गोळीबारात पूँछमधल्या नागरिकांचा हकनाक बळी गेला.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालाकोटवर हवाई हल्ला करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केला. पाकिस्तानने या हल्ल्याचा वेळोवेळी इन्कार केला आहे.

या हल्ल्यानंतर पूँछ, राजौरी क्षेत्रात पाकिस्तानने सीमारेषेचं उल्लंघन करून गोळीबार केल्याच्या घटना घडल्या होत्या. पाकिस्तानी सैन्याकडून पूँछ आणि राजौरीमध्ये गेले चार दिवस सतत गोळीबार सुरू आहे.

या गोळीबारामुळे कसबा, केरनी, गुतारियान आणि शहापूर या गावांमध्ये लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या नागरिकांना यामुळे खबरदारी घ्यावी लागणार आहे.

(ही बातमी अपडेट होत आहे)

=======================================================================================================================================================

VIDEO: अखेर चार तासानंतर बिबट्याचं पिल्लू जेरबंद

First published: April 1, 2019, 5:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading