पाक सैन्याने मानसिक छळ केला - अभिनंदन

पाक सैन्याने  मानसिक छळ केला - अभिनंदन

शुक्रवारी रात्री अभिनंदन यांनी पाकिस्तानची हद्द पार करत भारतात प्रवेश केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 मार्च : भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन शुक्रवारी(1मार्च )रात्री मायदेशी परतले आहेत. शुक्रवारी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास अभिनंदन यांनी पाकिस्तानची हद्द पार करत भारतात प्रवेश केला. यापूर्वी कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचं कारण देत पाकिस्तानने अभिनंदन यांच्या भारतवापसीमध्ये दिरंगाई केली होती.

पाकिस्तानच्या कैदेत असताना कशा पद्धतीची वागणूक मिळाली, याची माहिती अभिनंदन यांनी पहिल्यांदाच मायदेशी परतल्यानंतर दिली आहे. अभिनंदन यांनी सांगितले की, 'पाकिस्तानने माझा शारीरिक स्वरुपात नाहीतर प्रचंड मानसिक छळ केला'.

दरम्यान, कैदेत असताना अभिनंदन यांना चांगली वागणूक दिली जात असल्याचा व्हिडीओ पाकिस्तानकडून जारी करण्यात आला होता. अभिनंदन यांना पाकिस्तानी सैन्याकडून कोणताही त्रास दिला जात नाहीय, असे

चित्र या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले होते. पण सत्य परिस्थिती फार काळ लपून राहिली नाही. अभिनंदन यांनी दिलेल्या माहितीवरुन पाकिस्तानचं पितळं पुन्हा उघडं पडलं आहे.

अभिनंदन कसे पोहोचले होते पाकिस्तानात?

भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानांना पिटाळून लावत असताना भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग - 21 बुधवारी क्रॅश झाले होते. यानंतर त्यांनी पॅरेशूटच्या मदतीने खाली उडी घेतली आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरले. येथे पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले. गुरुवारी (28 फेब्रुवारी)पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करणार असल्याची घोषणा पाकिस्तानच्या संसदेत केली. शांततेचं पाऊल म्हणून आम्ही सुटका करत आहोत, असं इम्रान खान म्हणाले होते. पण, खरंतर विंग कमांडर अभिनंदन यांची सुटकेसाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबाव वाढला होता.नेमकी काय आहे घटना?

- पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय हद्दीत प्रवेश केला.

- पाकिस्तानच्या या विमानांना पिटाळण्यासाठी मिग-21 या भारतीय विमानांचे पायलट असलेल्या अभिनंदन यांनी F-16 चा पाठलाग केला.

- पाठलाग करताना त्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत F-16 ला पाडलं मात्र त्यांच्या विमानात बिघाड झाला.

- त्यानंतर त्यांनी पॅरेशुटच्या मदतीने खाली उडी घेतली आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरले.

- पाकिस्तानच्या किल्लान या गावात अभिनंदन यांना 27 फेब्रुवारीला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलं.

- पाकिस्तानच्या माध्यमांनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले.

- संध्याकाळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारताचा एक पायलट बेपत्ता असल्याचं मान्य केलं.

- नंतर जगभरातून पाकिस्तानवर दबाव निर्माण झाला. भारतानेही मुत्सद्देगिरीच्या पातळीवर हा विषय हाताळत पाकिस्तानवर मात केली

- आणि तणाव निवळण्यासाठी अखेर पाकिस्तानला अभिनंदन वर्तमान यांना सोडाव लागलं.


=======================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 06:57 PM IST

ताज्या बातम्या