जैश ए मोहम्मद आमच्या देशात अस्तित्वातच नाही : पाक लष्कराचा नवा दावा

जैश ए मोहम्मद आमच्या देशात अस्तित्वातच नाही : पाक लष्कराचा नवा दावा

पाकिस्तानी लष्कराने बुधवारी केलेला एक नवा दावा ऐकाल तर चक्रावून जाल. आमच्या देशात दैश ए मोहम्मद अस्तित्वातच नाही, असं तिथलं लष्कर म्हणतंय. गंमत म्हणजे चार दिवसांपूर्वीच या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जैशचा म्होरक्या मसूद अझहर पाकिस्तानात आजारी असल्याचं कबूल केलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 मार्च : पाकिस्तानी लष्कराने बुधवारी केलेला एक नवा दावा ऐकाल तर चक्रावून जाल. आमच्या देशात दैश ए मोहम्मद अस्तित्वातच नाही, असं तिथलं लष्कर म्हणतंय. यासंदर्भातली बातमी ANI ने दिली आहे. गंमत म्हणजे चार दिवसांपूर्वीच या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जैशचा म्होरक्या मसूद अझहर पाकिस्तानात आजारी असल्याचं कबूल केलं होतं.

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते असीफ गफूर CNN शी बोलताना म्हणाले की, जैश ए मोहम्मद ही संघटना पाकिस्तानात अस्तित्वात नाही. संयुक्त राष्ट्रसंघ (UN)आणि पाकिस्तानने त्यावर पूर्वीच बंदी घातली आहे."

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमूद कुरेशी यांनी अगदी चारच दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत जैशचा उल्लेख करत मसूद अझहर आजारी असल्याचं सांगितलं होतं.  शिवाय 4 मार्चला  पाकिस्तानचे माहिती आणि सांस्कृतिक मंत्री फैयाज उल हसन यांनी मसूद अझहर जिवंत असल्याची माहिती दिली होती. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसू अझहरचा मृत्यू झाल्याची कोणतीही वार्ता आमच्याकडे नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

दुसरीकडे, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर कुरापती पाकिस्तानवर जागतिक स्तरावर प्रचंड दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, 'जैश-ए-मोहम्मद'सहीत बंदी घालण्यात आलेल्या सर्व दहशतवादी संघटनांसंदर्भातील आपल्या भूमिकेवरुन पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चक्क यू-टर्न घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC)दहशतवाद्यांच्या यादीमध्ये 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरला नावाचा समावेश करण्याच्या प्रस्तावास पाकिस्तान समर्थन दर्शवण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील वृत्तपत्र 'एक्स्प्रेस ट्रिब्यून'मध्ये यासंदर्भातील वृत्त देण्यात आले आहे.

First published: March 6, 2019, 8:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading