भारतात हल्ले घडवून आणण्याचा पाकिस्तानचा नवा डाव, खळबळजनक माहिती उघड

भारतात हल्ले घडवून आणण्याचा पाकिस्तानचा नवा डाव, खळबळजनक माहिती उघड

यातले अनेक गँगस्टार्स हे फरार आहेत किंवा काही जेलमध्ये आहेत. त्या सगळ्यांशी संपर्क स्थापन करण्याचं काम दहशतवादी करत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 24 ऑगस्ट: भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने आता नवी चाल खेळली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI यासाठी सक्रिय असून आता भारतातल्या गँगस्टर्स आणि गुंडांना हाताशी धरून हल्ले घडवून आणण्याची योजना आखत असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. सुरक्षा दलांनी दहशतवादी संघटनांविरुद्ध धडक मोहिम हाती घेतल्याने त्यांचं कंबरडं मोडलं असून आता नवा डाव पाकिस्तान खेळत असल्याची माहिती आहे.

स्थानिक गुंड आणि गँगस्टर्स यांचं स्थानिक पातळीवर नेटवर्क असतं. त्या नेटवर्कचा उपयोग करून घातपात घडविण्याची ही योजना आहे. पंजबामध्ये यासंबंधातल्या काही घटना उघडकीस आल्याने गुप्तचर विभागाने सर्वच स्तरावर याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

यातले अनेक गँगस्टार्स हे फरार आहेत किंवा काही जेलमध्ये आहेत. त्या सगळ्यांशी संपर्क स्थापन करण्याचं काम दहशतवादी करत असून त्यांची मदत घेत घातपात घडविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या गुंडांना पैशांचं अमिश दाखखवून त्यांच्याकडून हे काम करून घेतलं जाण्याची शक्यता आहे. किंवा त्यांच्या नेटवर्कचा वापर करून दहशतवादी घातपात घडविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेसच्या राजकीय नाट्यात अहमद पटेलांची एण्ट्र, राहुल गांधींसाठी मोर्चेबांधणी

दरम्यान, राजधानी दिल्लील्या धौलाकुआं भागातून अटक केलेल्या आयएसआयएस (ISIS) च्या दहशतवादाच्या घरात स्फोटकांचा साठा सापडला आहे. या स्फोटकांचा वापर करून दिल्लीला दाहरविण्याचा अतिरेक्यांचा डाव उधळला गेला आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police)  अबू यूसुफ (Abu Yusuf) उर्फ मुस्तकीम याला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापे घातले त्यात हा शस्त्रसाठा सापडला आहे.

दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम या प्रकरणाचा तपास करत असून त्यातून अनेक खळबळजनक गोष्टी बाहेर येत आहेत.

आधी रोजगार आता डोक्यावर छत; सोनू सूद हजारो प्रवासी मजुरांना देणार हक्काचं घर

पोलिसांनी धाडी टाकून जेव्हा हा साठ जप्त केला तेव्हा त्यांना ही धक्कादायक गोष्टी समजली. दिल्लीत एकाच वेळी दोन स्फोट घडविण्याची त्याची योजना होती. त्यासाठी त्याने दोन प्रेशर कुकरही आणलेले होते. त्यात 5 किलो स्फोटकं भरून त्याचा बॉम्ब करण्यात आला होत. त्याला टायमरही लावण्यात आले होते. त्यामुळे हा कट मोठा होता अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 24, 2020, 4:27 PM IST

ताज्या बातम्या