कुलभूषण जाधव प्रकरण; फाशीच्या शिक्षेबाबत पाकिस्ताननं घेतला मोठा निर्णय

कुलभूषण जाधव प्रकरण; फाशीच्या शिक्षेबाबत पाकिस्ताननं घेतला मोठा निर्णय

पाकिस्तानने कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांना पाकिस्तानद्वारे (Pakistan) दिल्या गेलेल्या शिक्षेविरोधात कोणत्याही उच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी दिली आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय बहुमताने मान्य केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 11 जून : पाकिस्तानच्या संसदेने कुलभूषण जाधव प्रकरणात मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांना पाकिस्तानद्वारे (Pakistan) दिल्या गेलेल्या शिक्षेविरोधात कोणत्याही उच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी दिली आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय बहुमताने मान्य केला आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्यानं एएनआयनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाचं वजन माहिती आहे का? वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

मे महिन्याच्या सुरूवातीच्या काळात कुलभूषण जाधव यांना फाशीच्या शिक्षेच्या सुनावणी करत पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं भारताला या प्रकरणात कायदेशीर कारवाईत सहकार्य करण्यास सांगितले होते. त्याचवेळी असं म्हटलं गेलं होतं, की न्यायालयात हजर होणे म्हणजे सार्वभौमत्वामधील सूट नाही. इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या तीन-सदस्यांच्या खंडपीठाने बुधवारी पाकिस्तानच्या कायदा व न्याय मंत्रालयाच्या याचिकेवर सुनवाणी सुरू केली. यात जाधव यांच्यासाठी वकील नेमण्याच्या मागणी करण्यात आली आहे.

Googleने आपल्याच CEOच्या वाढदिवसाच्या तारखेत केला गोंधळ;सर्चमध्ये 2 तारखा समोर

पाकिस्तानच्या एका सैन्य न्यायालयानं 2017 मध्ये कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव इराणमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने गेले होते. त्यांना पाकिस्तानने हेरगिरीसाठी देशात प्रवेश केल्याप्रकरणी अटक केली होती. मात्र, कुलभूषण यांनी पाकिस्तानच्या लष्करी कोर्टात असं सांगितलं, की त्यांना इराणमधून अपहरण करुन पाकिस्तानमध्ये आणले आणि खोट्या आरोपांत अटक केली. पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने कुलभूषण जाधव यांचा आरोप फेटाळला आणि त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. लष्करी कोर्टाच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी कुलभूषण जाधव यांच्यावतीने भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.

Published by: Kiran Pharate
First published: June 11, 2021, 6:37 AM IST

ताज्या बातम्या