Breaking: भारताने पाकिस्तानचं F16 विमान पाडलं

Breaking: भारताने पाकिस्तानचं F16 विमान पाडलं

भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं आहे. विमानातील सैनिक पॅराशूटमधून उतरताना दिसले.

  • Share this:

श्रीनगर, २७ फेब्रुवारी २०१९- भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत- पाकिस्तानच्या एलओसीवर तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. यात दर मिनिटाला नवीन अपडेट येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं आहे. विमानातील सैनिक पॅराशूटमधून उतरताना दिसले. मात्र ते नक्की कोणत्या दिशेला गेले हे अजून कळू शकले नाही.

दरम्यान, काही वेळापूर्वी पाकिस्तानचं विमान भारताच्या हद्दीत आलं होतं. पण पाकिस्ताननं काही आगळीक करण्याआधीच भारतीय हवाई दलानं या विमानाला परतवून लावलं आहे. परतताना पाकिस्तानी सैनिकांनी बॉम्बहल्ला केला. मात्र त्याच्याने कोणतेच नुकसान झाले नाही. भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरात जाऊन दहशतवादी तळावर हल्ला केला. त्यानंतर भारताला प्रत्युत्तर देण्याची धमकी पाकिस्तानने दिली होती. यानंतर आता पाकिस्तानचं विमान भारताच्या हद्दीत आलं होतं.

दरम्यान, भारताच्या हवाई हल्ल्यानंतरही पाकच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे.



भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे सध्या जम्मू-काश्मीरमधील वातावरण अजूनही धुमसत असल्याचं चित्र आहे.

उत्तर भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना हाय- अलर्ट देण्यात आले. तसेच काश्मीर आणि श्रीनगरचे विमानतळ प्रवाशी विमानांसाठी काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच जम्मू, श्रीनगर, लेहकडे जाणाऱ्या प्रवाशी विमानांना मूळ शहरांकडे परत पाठवण्यात आले आहे.

इंडिगो, गो एअर कंपनीच्या विमानांना पुन्हा दिल्ला विमानतळावर पाठवण्यात आले आहेत. तसेच लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अनेक व्यावसायिक कंपन्यांच्या विमानांना उड्डाण भरण्यास मनाई करण्यात आली आहे.

भारतीय हवाई दलाचं विमान कोसळलं, घटनास्थळावरील EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 12:18 PM IST

ताज्या बातम्या