नवी दिल्ली, 16 जुलै : पाकिस्तानातील तुरुंगाद कैद भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना दुसरा कौन्सिलर एक्सेस मिळाला आहे. कौन्सिलर एक्सेस मिळाल्यानंतर भारतीय अधिकारी पाकिस्तानाच्या विदेश मंत्रालय पोहोचले आहेत. हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानातील सैन्य कोर्टातर्फे मृत्यूची शिक्षा दिलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव सध्या पाकिस्तानी तुरुंगात कैद आहेत.
पाकिस्तानच्या तुरुंगातली भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणात भारत सरकारने पाकिस्तानला सांगितले की ते कोणत्याही अटीशर्थी विना कुलभूषण जाधवला भेटू द्यावे. पाक सरकारच्या सूत्रांनुसार जर सर्व अटी पूर्ण झाल्या तर भारत पहिल्यांदा तपास करेल. भारताने सांगितले की आमची इच्छा आहे की पाकिस्तानने दोन अधिकाऱ्यांना कुलभूषणला भेटण्याची परवानगी द्यावी.
हे वाचा-VIDEO इराणने का दिला भारताला धक्का? जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहा
पकिस्तानने हा दावा केला आहे की जाधव यांनी रिव्यू पिटिशन दाखल करण्यास विरोध केला आहे. पाकिस्तानच्या या दाव्यानंतर भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता म्हणाले की जाधव यांच्याबाबतचा पाकिस्तानचा दावा दूरगामी आहे. भारत जाधव यांना वाचवण्यासाठी सर्व कायदेशीर पर्यायांचा तपास करीत आहे. मंत्रालयाने पाकिस्तानच्या दाव्याविषयी ते म्हणाले की गेल्या 4 वर्षांपासून पाकिस्तानकडून केला जाणारा हा दावा खोटा आहे. 2016 पासून कुलभूषण जाधव पाकिस्तानातील तुरुंगात आहेत. त्यांना वाचविण्यासाठी भारत सरकारकडून विविध पर्यायांचा अवलंब केला जात आहे