कबूल कबूल कबूल! पाकिस्तान म्हणतो, आमच्या देशात दहशतवादी आहेत

कबूल कबूल कबूल! पाकिस्तान म्हणतो, आमच्या देशात दहशतवादी आहेत

आपल्या देशात दहशतवादी असल्याची कबूली पाकिस्तानी लष्करानेच दिल्याने भारताच्या दाव्याला आणखी बळकटी मिळाली आहे.

  • Share this:

इस्लामाबाद 29 एप्रिल : पाकिस्तानमध्ये दहशतवादी आणि कट्टरतावादी असल्याची कबूली पाकिस्तानी लष्कराने दिली आहे. असे लोक देशात आहेत आणि त्यांच्या विरुद्ध खूप काही करण्यासारखं आहे असं मत पाकिस्तानाची लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल हसन गफूर यांनी व्यक्त केलंय. पाकिस्तानी लष्करानेच हे मत व्यक्त केल्यान भारताच्या दाव्याला आणखी बळकटी मिळाली आहे.

पाकिस्तानमध्ये दहशतवादाला खतपाणी घातलं जातं असा भारत कायम आरोप करत असतो. मात्र प्रत्येक वेळी पाकिस्तानकडून त्याचा इन्कार केला जातो. जोपर्यंत दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी घालत आहे तोपर्यंत चर्चा करणार नाही अशी ठाम भूमिका भारताने घेतली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर परिस्थिती बदलल्याने पाकिस्तानवर जगभरातून दबाव निर्माण झालाय. दहशतवादांविरुद्ध ठोस कारवाई करा अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहा असा इशाराही अमेरिकेने दिला होता. या दबावानंतर पाकिस्तानने जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेविरुद्ध कारवाई केली. मात्र ही कारवाई ही निव्वळ धुळफेक असल्याची टीका भारताने केली होती.

या आधीच्या सरकारने दहशतवादा विरुद्ध कारवाई करण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च केले मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. सध्याचं सरकार हे प्रामाणिकपणे पावलं टाकत असल्याचंही गफूर म्हणाले. पंतप्रधान इम्रान खान हे लष्कराच्या हातातलं बाहुलं असल्याचं कायम म्हटलं जातं. गफूर  यांनी इम्रान खान यांच्या सरकारचं केलेलं कौतुक महत्त्वाचं मानलं जातं.

दहशतवादाने पाकिस्तानचं खूप नुकसान केलं आहे. पाकिस्तानने खूप सोसलं आहे. त्यामुळे आमच्या भूमिकेविषयी शंका घ्यायला नको. आम्ही ठोसपणे कारवाई करतोय आणि करणार आहोत असंही गफूर यांनी सांगितलंय. जगभरातल्या अनेक आर्थिक संस्थांनीही पाकिस्तानला तंबी दिली आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला दहशतवाद्यांविरुद्ध ठोस कारवाई केल्याशीवाय पर्याय नाही असंही बोललं जातंय. त्यामुळे पाकिस्तानच्या कृतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

First published: April 29, 2019, 9:11 PM IST

ताज्या बातम्या