इस्लामाबाद, 29 मार्च : भारताने हवाई हल्ला केलेल्या बालाकोटमध्ये पाकिस्तानच्या निमलष्करी दलाने अजूनही वेढा दिला आहे. या भागात कुणालाही जाऊ दिलं जात नाही.
पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर १३ दिवसांनी भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. या हल्ल्यात मसूद अझरच्या 'जैश ए मोहम्मद' या संघटनेचे तळ उद्ध्वस्त केल्याचा भारताचा दावा आहे. पण असं काहीच झालं नाही, असं पाकिस्तानचं म्हणणं आहे.
बालाकोट हल्ल्यानंतर आता ३२ दिवसांनी पाकिस्तानी सैन्याने पत्रकारांना या घटनेच्या ठिकाणी नेलं. बालाकोटमधल्या काही भागांत अजूनही पाकिस्तानच्या निमलष्करी दलाचा वेढा आहे आणि काही भागात अजून कुणालाही जाऊ दिलं जात नाही.
बालाकोटमध्ये भारताने हल्ला केला त्याठिकाणी पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करण्यात आलं आहे.
8 पत्रकारांचा दौरा
पाकिस्तानने २८ मार्चला याठिकाणी 8 मीडिया ग्रुपच्या पत्रकारांनी हेलिकॉप्टरने नेलं होतं.हे पत्रकार सकाळी १० वाजल्यापासून ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत या भागात फिरले.बालाकोटमध्ये पहिल्यासारखं काही राहिलेलं नाही हे पत्रकारांना दिसून आलं. पण पाकिस्तानने भारताचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. भारताच्या हवाई हल्ल्यात काहीच नुकसान झालं नाही. तसंच इथे कोणतेही दहशतवादी तळ नव्हते, असं सांगण्याचाही पाकिस्तानने प्रयत्न केला.
बालाकोटमधल्या या दाट जंगलाच्या भागात 'जैश ए मोहम्मद'या संघटनेच्या इमारती होत्या. हवाई हल्ल्यात या इमारती उद्ध्वस्त झाल्या, असं भारताने म्हटलं आहे. पण पाकिस्तानने वारंवार याचा इन्कार केला. याआधी, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पत्रकारांना बालाकोटला नेण्यात येईल, असं पाकिस्तानने म्हटलं होतं. त्यानुसार, या पत्रकारांना बालाकोटला नेण्यात आलं.
==========================================================================================================================================================================================
SPECIAL REPORT : गोविंदा पुन्हा राजकारणाच्या रिंगणात, 'या' मतदारसंघात लढवू शकतो निवडणूक