कासगंज हिंसाचारामागे पाकिस्तानचा हात, भाजपच्या खासदाराचं वक्तव्य

कासगंज हिंसाचारामागे पाकिस्तानचा हात, भाजपच्या खासदाराचं वक्तव्य

"कासगंजमध्ये पाकिस्तानी लोकं येत आहे. त्यांना भारताचा ध्वज मान्य नाही. त्यामुळेच त्यांनी त्या दिवशी 'पाकिस्तान झिंदाबाद' असे नारे दिले होते"

  • Share this:

30 जानेवारी : कासगंज हिंसाचारामागे पाकिस्तानच्या समर्थकांचा हात आहे असं वक्तव्य भाजपचे खासदार विनय कटियार यांनी केलंय. ते एवढ्यावर थांबले नाही तर चंदन गुप्ताची हत्याही पाक समर्थकांनी केली.

विनय कटियार हे भाजपचे राज्यसभेचे खासदार आहे. त्यांनी कासगंज हत्या प्रकरणावर वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. "कासगंज प्रकरण गंभीर आणि दुर्दैवी आहे. या भागात कधी अशी घटना घडली नाही. 26 जानेवारीला काही पाकिस्तानी समर्थकांनी तिरंगा रॅलीत घुसखोरी करून धुडगूस घातला. त्यांनी तिरंगा ध्वजाचा अपमान केला" असा आरोपही कटियार यांनी केला.

कासगंजमध्ये पाकिस्तानी लोकं येत आहे. त्यांना भारताचा ध्वज मान्य नाही. त्यामुळेच त्यांनी त्या दिवशी 'पाकिस्तान झिंदाबाद' असे नारे दिले होते. त्यामुळे अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही कटियार यांनी केली.

विनय कटियार यांनी कासगंज प्रकरणी योगी सरकारने केलेल्या कारवाईचं कौतुक केलं. योगी सरकारने कडक पावलं उचलली असून आणि आणखी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. सरकारने एसआयटी स्थापन केली असून कुणीही आरोपी यातून सुटणार नाही असंही कटियार म्हणाले.

काय आहे कासगंज प्रकरण ?

शुक्रवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी विश्व हिंदू परिषद (व्हिएचपी) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तिरंगा रॅली काढली होती. तिरंगा यात्रा जेव्हा बिलमार गेटजवळ मुस्लिमबहुल भागातून जात होती तेव्हा तिरंगा यात्रेतील तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे दोन गटामध्ये धुमश्चक्री उडाली. दोन्ही गटांकडून दगडफेक झाली आणि गोळीबारही झाला. या गोळीबारात चंदन गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला. चंदनच्या मृत्यूमुळे जमाव आणखी संतप्त झाला. संतप्त जमावाने दुकानांनी तोडफोड आणि जाळपोळ केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संचारबंदी लागू केली. आतापर्यंत या प्रकरणात 112 लोकांना अटक करण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2018 10:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading