विमानात तडफडत राहिला भारतीय तरूण, पण पाकिस्तानने दिली नाही डॉक्टरांची मदत

विमानात तडफडत राहिला भारतीय तरूण, पण पाकिस्तानने दिली नाही डॉक्टरांची मदत

तुर्कीहून भारतात परतणारा एक भारतीय तरूण विमानात आजारी पडला. पायलटने लाहोर विमानतळावर विमानाचं इमर्जन्सी लँडींग केलं मात्र पाकिस्तानने त्या तरूणाला वैद्यकीय सेवा देण्यास नकार दिला.

  • Share this:

नवी दिल्ली,ता.14 ऑगस्ट : पाकिस्तानचा अमावी चेहेरा पुन्हा एकदा पुढं आलाय. तुर्कीहून भारतात परतणारा एक भारतीय तरूण विमानात आजारी पडला. दुखण्याने तो तडफडत होता. पायलटने लाहोर विमानतळावर विमानाचं इमर्जन्सी लँडींग केलं मात्र पाकिस्तानने त्या तरूणाला वैद्यकीय सेवा देण्यास नकार दिला. तो भारतीय असल्यानेच त्याला पाकिस्तानने वैद्यकीय मदत देण्यास नकार दिल्याचं कारण स्पष्ट झाल्याने पाकिस्तानच्या या कृतीचा तीव्र निषेध करण्यात येतोय. त्या तरूणावर सध्या दिल्लीच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना 12 ऑगस्टी असून त्याची माहिती मंगळवारी पुढं आलीय.

Independence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा !

...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान

राजस्थानच्या भिवडी शहरातला विपीन कुमार हा 33 वर्षांचा तरूण एका विमा कंपनीत काम करतो. कंपनीच्या कामासाठी तो तुर्कीला गेला होता. तिथून नवी दिल्लीला तो तुर्कीश एअरलाईनच्या TK 716 या विमानाने इस्तंबुलहून नवी दिल्लीला यायला निघाला. रात्री त्याने विमानात वाईन घेतली होती. काही वेळानंतर त्याला अस्वस्थ वाटत वाटायला लागलं आणि परिस्थिती गंभीर बनली. विमानात असलेल्या एका भारतीय डॉक्टरने त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. नंतर पायलयने विमानाचं लाहोर विमानतळावर इमर्जंसी लँडींग केलं आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडे वैद्यकीय मदत मागितली.

'औरंगाबाद एमआयडीसीत तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नाही'

मात्र दोन्ही देशांचे तणावपूर्व संबंध आणि इम्रिग्रेशनचं कारण देत विमानतळ अधिकाऱ्यांनी वैद्यकीय मदत देण्यास नकार दिला. त्या दरम्यान विपीन बेशुध्द झाला. शेवटी तीन तास वाट बघितल्यानंतर विमान नवी दिल्लीसाठी निघालं. दिल्लीत आल्यानंतर विपीन कुमारला मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्या आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. राजकीय संबंध तणावाचे असले तरी मानवतेच्या भुमिकेतून पाकिस्तानने मदत करायला पाहिजे होती अशा प्रतिक्रीया सोशल मीडियवर व्यक्त होत आहेत.

 

 

सचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2018 10:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading