...आणि पाकचा अतिउत्साही जवान घसरून आपटला

...आणि पाकचा अतिउत्साही जवान घसरून आपटला

जोरजोरात पाय आपटत तो पुढे येत होता आणि अचानक त्याचा पाय घसरला आणि तसाच खाली कोसळला.

  • Share this:

17 जुलै : सीमारेषेवर पाकिस्तानाकडून कुरापत्या सुरूच आहे. भारतीय चौक्यांवर पाक सैनिकांचा गोळीबार अधूनमधून सुरूच असतो. पण सीमारेषेवर प्रतिष्ठेच्या रिट्रीट सोहळ्यात पाकच्या इज्जतीचा पाकच्याच सैनिकाने पार कचरा केलाय.

त्याचं झालं असं की, पंजाब सीमारेषेवर हुसैनीवाला इथं बिटींग द रिट्रीट सोहळा सुरू होता. दोन्ही देशातील जवान मानवंदना देत होते. हा सोहळा पाहण्यासाठी दोन्ही देशाकडील नागरिक मोठ्या संख्येनं जमले होते.  दोन्ही देशाचे जवान आपआपल्या ध्वजाला मानंवदना देत होते.

पाकचा एक जवान मोठ्या जोशात पाकच्या ध्वजाला सलामी देण्यासाठी पुढे आला. जोरजोरात पाय आपटत तो पुढे येत होता आणि अचानक त्याचा पाय घसरला आणि तसाच खाली कोसळला.

तो खाली कोसळताच उपस्थिती असलेल्या भारतीय नागरिकांमध्ये एकच हशा पिकली. हा सगळा प्रकार व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय. आणि आता तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.

First published: July 17, 2017, 9:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading