भारतावर अण्वस्त्र हल्ला करू म्हणणाऱ्या पाक मंत्र्याची धुलाई, VIDEO VIRAL

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्यानंतर पाकचे रेल्वेमंत्र्यांनी अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2019 01:17 PM IST

भारतावर अण्वस्त्र हल्ला करू म्हणणाऱ्या पाक मंत्र्याची धुलाई, VIDEO VIRAL

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : भारताने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्यानंतर पाकच्या पंतप्रधानांसह अनेक नेत्यांनी गरळ ओकली. यात पाकचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी थेट अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती. त्याच मंत्र्यांना लंडनमध्ये अज्ञातांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता पाकच्या मंत्रीमहोदयांना अंडीसुद्धा फेकून मारण्यात आली.

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाकचे रेल्वेमंत्री शेख रशीद पुरस्कार सोहळ्यासाठी लंडनला गेले होते. तेव्हा एका मोठ्या हॉटेलमध्ये पुरस्कार सोहळा सुरू होता. शेख रशीद काही कारणांनी हॉटेलच्या बाहेर आले होते. तेव्हा अज्ञात लोकांनी त्यांना मारहाण केली. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान पीपल्स पार्टीशी संबंधित काही नेत्यांनी घेतली असल्याचं म्हटलं जात आहे. पीपल्स यूथ ऑर्गनायझेशन युरोपचा अध्यक्ष असलेल्या असिफ अली खान आणि महिला शाखेच्या अध्यक्ष समा नमाज यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांच्याबद्दल शेख रशीद यांनी अपशब्द वापरले होते. त्यानंतर पीपीपीचे कार्यकर्ते आणि महिला नाराज होत्या. कार्यकर्त्यांनी शेख रशीद यांच्यावर अंडी फेकली असून या घटनेचा व्हिडिओसुद्धा ट्विटरवरून पोस्ट करण्यात आला आहे.

शेख यांना आम्ही फक्त अंडी फेकून मारली याबद्दल त्यांनी आभार मानले पाहिजे. त्यांनी ज्या अपशब्दांत बिलावल भुट्टो यांच्यावर टीका केली त्यापुढे झालेली मारहाण कमी असल्याचं मत खान यांनी व्यक्त केलं. शेख रशीद अवामी मुस्लीम लीगचे नेते आहेत. पक्षाने अशा प्रकारची मारहाण झाल्याचा कोणताही व्हिडिओ आपल्याकडे नसल्याचं म्हटलं आहे.

Loading...

VIDEO: एअर इंडिया अडचणीत येण्याची शक्यता, इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pakistan
First Published: Aug 23, 2019 01:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...