PM मोदींना धमकी देऊन पाकची पॉप सिंगर फसली, आता जाणार तुरुंगात?

PM मोदींना धमकी देऊन पाकची पॉप सिंगर फसली, आता जाणार तुरुंगात?

काश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर पाकिस्तानच्या पॉप सिंगरने एक व्हिडिओ शेअर केला होता.

  • Share this:

लाहोर, 15 सप्टेंबर : जम्मू काश्मीरमधून भारतानं कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. त्यांच्या नेत्यांसह इतर क्षेत्रातील व्यक्तिंनीही यावर अनेक वक्तव्य केली आहेत. पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी तर चक्क अणुयुद्धाचीच धमकी दिली होती. देशाच्या पंतप्रधानांनीच अशा धमक्या दिल्यावर इतर लोक कसे मागे राहतील. पाकिस्तानी पॉप सिंगर रबी पीरजादा हीने थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकी देण्याचा आगाऊपणा केला. पण हा अगाऊपणा तिच्या अंगलट आला.

मोदींना धमकी देण्यासाठी पाकिस्तानी पॉप स्टार रबीने तिच्या ब्यूटी सलूनमध्ये चक्क सापांना आणून ठेवलं होतं. आता पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील वन्यजीव संरक्षण आणि उद्यान विभागाने रबी पीरजादाला नोटीस पाठवली असून कायदेशीर कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. तिच्याविरुद्ध स्थानिक न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर रबी पीरजादानं अजगरासह अनेक सापांसोबतचा व्हिडिओ शूट केला होता. यात तिने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकी दिली होती की, मी एक काश्मीरी महिला, भारतासाठी सापांसह तयार आहे. ही भेट खरंतर मोदींसाठी आहे. रबी पीरजादानं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अजगर आणि मगरीसह दिसत आहे.

रबीने म्हटलं होतं की, हे सर्व मोदींसाठी आहे. तुम्ही काश्मीरींना त्रास देत आहेत आता नरकात मरण्यासाठी तयार व्हा. माझ्या सर्व मित्रांना शांतता हवी आहे. रबीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्राण्यांच्या जीवाला धोका होईल असे वर्तन केल्यानं तिच्याविरुद्ध तक्रार दाखल कऱण्यात आली. त्यानंतर वन्यजीव संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्यानं तिच्यावर कारवाई होऊ शकते.

VIDEO: काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तू तू-मैं मैं; लाडूसाठी तुफान राडा

Published by: Suraj Yadav
First published: September 15, 2019, 12:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading