सुधारणार नाहीच! पाक लष्कराला भारतावर हल्ल्याचा आदेश देऊ का?- इमरान खान बरळले

सुधारणार नाहीच! पाक लष्कराला भारतावर हल्ल्याचा आदेश देऊ का?- इमरान खान बरळले

जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकाला राज्यसभा आणि लोकसभेत मंजुरी मिळाल्यानं शत्रूराष्ट्र पाकिस्तान बिथरला आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 7 ऑगस्ट : केंद्रीतील मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरसंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 (Article-370)हटवणं आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकाला राज्यसभा आणि लोकसभेत मंजुरी मिळाल्यानं शत्रूराष्ट्र पाकिस्तान बिथरला आहे. कलम 370 संदर्भातील निर्णयामुळे पाकिस्तानचा झालेला तिळपापड आज त्यांच्या संसदेत पाहायला मिळाला. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार केल्याप्रकरणी पाकिस्तान सरकारनं भारताला जशीच्या तशी तीव्र प्रतिक्रिया द्यायला हवी, अशी गरळ येथील विरोधी पक्षनेते आणि पीएमएल-एनचे नेते शहबाज शरीफ यांनी ओकली आहे.

(वाचा : Article 370 : आता पाकव्याप्त काश्मिरातल्या लोकांनाही भारतात व्हायचं सामील)

भारतावर हल्ला करण्याचा आदेश देऊ? - इमरान खान

शरीफ यांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान देखील काहीही बरळले आहेत. 'विरोधी पक्षनेत्यांना नेमकं काय हवंय? मी पाकिस्तानी सैनिकांना भारतावर हल्ला करण्याचा आदेश द्यायला हवा?' इमरान खान यांनी अशी विचारणा केल्यानं पाकिस्तानचा कुरापती चेहरा पुन्हा एकदा सर्वांसमोर आला आहे. इमरान खान आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयासह येथील सैन्य तसंच अन्य लोकही मोदी सरकारच्या निर्णयावरून भारताविरोधात विखारी प्रतिक्रिया देत आहेत.

यादरम्यानच, 'मोदी सरकारला काश्मीरचं दुसरं फिलिस्तान करण्याचं इच्छा आहे. पाकिस्तानच्या खासदारांनी भारताला रक्तानं प्रत्युत्तर द्यायला हवं. जर युद्ध लादलं गेलं तर आपल्यालाही युद्धासाठी सज्ज राहायला हवं', असे ट्विट पाकिस्तानचे मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी केलं आहे. यावरून पाक मंत्र्यांच्या मनात भारताविरोधात किती द्वेषभावना आहे, हे स्पष्ट झालं.

(पाहा : जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक संसदेत मंजूर; पाहा त्या ऐतिहासिक क्षणाचा VIDEO)

इमरान खान यांची संसदेत निरर्थक बडबड

दुसरीकडे, इमरान यांनी संसदेत बाष्फळ बडबड करत म्हटलं की, 'आम्ही या प्रकरणी संयुक्त राष्ट्राकडे दाद मागू. भाजपच्या जातीयवादी विचारसरणीमुळे भारतातील अल्पसंख्याकांना कशा पद्धतीनं वागणूक दिली जाते, हेदेखील आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगू'. पण आपल्याच कुरापतींमुळे यापूर्वी अनेकदा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर तोंडघशी पडलेला आहे.

(वाचा : टॉप सिक्रेट होतं 'मिशन काश्मीर', अमित शहांनी अशी केली मोहीम फत्ते)

पाकिस्‍तानी सैन्याची काश्मीरसंदर्भात बैठक

पाकिस्तानी सैन्यानं आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर कलम 370 संदर्भात एक पोस्ट केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की,'काश्मीरमधली सद्यस्थिती संदर्भात एक बैठक घेण्यात आली. पाक लष्कर इथल्या सरकारसोबत आहे. भारतानं काश्मीरसंदर्भात घेतलेला निर्णय पाक लष्करानं स्वीकार केलेला नाही. पाक सैन्य या अत्याचाराविरोधात काश्मीर नागरिकांच्या पाठीशी उभे आहे', असं पोकळ आश्वासन देखील दिलं गेलं.

बचावकार्यादरम्यान बोट उलटली अन्...पाहा श्वास रोखणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 12:45 PM IST

ताज्या बातम्या