पाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी!

पाकच्या रेल्वेमंत्र्यांची भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी!

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद खान यांनी आता नेहमीसारखं युद्ध होणार नाही असं म्हटलं आहे.

  • Share this:

कराची, 22 ऑक्टोबर : पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद खान यांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. आता नेहमीसारखं युद्ध नाही तर फक्त अण्विक युद्ध होईल असं रशीद यांनी म्हटलं आहे. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भारताचं नाव न घेता वक्तव्य केलं. भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानची पळताभुई थोडी झाली आहे. बिथरलेल्या पाकिस्तानकडून बेताल अशी वक्तव्ये केली जात आहेत.

रशीद यांनी म्हटलं की, आता टँक आणि तोफा चालतील असं युद्ध केलं जाणार नाही. आता फक्त अण्विक युद्ध होईल. याआधी मी 126 दिवस आंदोलनात सहभागी झालो होतो. तेव्हा देशातली परिस्थिती वेगळी होती. आता एअर टँक किवा नौदलाकडून हल्ला केला जाणार नाही तर फक्त अण्विक युद्ध होईल. तसेच ज्याप्रकारची गरज असेल त्याप्रकारे अण्विक हल्ला केला जाईल.

याआधी पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनीही अण्विक हल्ल्याची धमकी दिली होती. त्यानंतर शेख रशीद यांनी ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअऱ केला होता. त्यामध्ये म्हटलं होतं की, इमरान खान यांनी स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानकडे कोणी वाकड्या नाजरेनं पाहिलं तर त्याची खैर नाही. ना चिमण्यांचा चिवचिवाट होईल ना मंदिरात घंटानाद. आम्ही कमी नाही पाकिस्तान आमचं जीवन आणि पाकिस्तानच मृत्यू आहे असं म्हटलं होतं.

रविवारी पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर भारताने चोख प्रत्युतर दिलं. भारतानं केलेल्या कारवाईत चार दहशतवादी तळ आणि पाकिस्तानी सैन्याच्या ठिकाणांवर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये पाकिस्तानचे 10 हून अधिक सैनिक आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. तर भारताच्या दोन जवानांना वीरमरण आलं होतं.

VIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 11:44 AM IST

ताज्या बातम्या