News18 Lokmat

हिंदूंविरोधात बोलणं पाक मंत्र्याला पडलं भारी, मंत्रिपदावरून हकालपट्टी

पाकिस्तानी मीडियानुसार, पाकमध्ये असलेल्या पंजाबचे माहिती आणि सांस्कृतिक मंत्री फैयाज उल हसन चौहान यांनी हिंदू धर्माविरोधात अपमानास्पद टिपण्णी केली.

News18 Lokmat | Updated On: Mar 5, 2019 10:21 PM IST

हिंदूंविरोधात बोलणं पाक मंत्र्याला पडलं भारी, मंत्रिपदावरून हकालपट्टी

नवी दिल्ली, 05 मार्च : पाकिस्तानचे पंजाबचे मंत्री फैयाज उल हसन चौहान (Fayyazul Hassan Chohan) यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. हिंदूंविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानं इम्रान खान सरकारनं त्यांना पदावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदूंविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

पाकिस्तानी मीडियानुसार, पाकमध्ये असलेल्या पंजाबचे माहिती आणि सांस्कृतिक मंत्री फैयाज उल हसन चौहान यांनी हिंदू धर्माविरोधात अपमानास्पद टिपण्णी केली. त्यांचा एक व्हिडिओदेखील ट्विटरवर व्हायरल करण्यात आला होता. त्यांच्या या व्हिडिओवर कारवाई करत पाक सरकारनं त्यांना पदावरून काढून टाकलं.


Loading...


चौहान यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये हिंदू समाजाला 'गायीचं मूत्र पिणारा' असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडिमार होत होता. पाकिस्तान-तहरीक ए-इंसाफ (PTI) या ट्विटर अकाऊंटवरून सांगण्यात आलं आहे की, पंजाब सरकारने हिंदू समाजाविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या चौहान यांना पदावरून काढून टाकण्यात आलं आहे.


हवाई हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले? पुराव्याचं राजकारण काही संपेना

भारताने 26 फेब्रुवारीला बालकोट इथं केलेल्या हवाई हल्ल्याला आता आठ दिवस झालेत. मात्र या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मेलेत यावरून सुरू असलेलं राजकारण थांबता थांबेना. माध्यमांनी सूत्रांचा हवाला देऊन 300 ते 400 दहशतवादी ठार झाल्याचं सांगितलं तर सरकारने अजुन अधिकृत आकडेवारी सांगितली नाही. तर विरोधीपक्ष पुरावा मागत असल्याने प्रकरण आणखीच चिघळलं आहे.

हवाई हल्ल्याचं राजकारण करू नका असं सांगत सर्वच पक्षांनी हल्ल्याच्या राजकारणाला सुरुवात केलीय. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी हल्ल्यात नेमके किती अतिरेकी ठार झालेत याचे पुरावे द्या अशी मागणी विरोधी पक्ष करतंय. तर लष्करावर शंका घेता का असा आरोप कर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या देशभक्तीवरच शंका घेतली आहे.

राजनाथ सिंग काय म्हणाले?

बालाकोट इथल्या जैशच्या ट्रेनिंग सेंटरवर इंटरनेटची 300 कनेक्शन्स असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे तिथे 300 जण असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तिथेच कुणीच नसतं तर 300 कनेक्शन्स काही झाडांसाठी होती काय असा सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केलाय.

'या' नेत्यांकडून पुराव्याची मागणी

भारतीय वायुदलानं केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे मागितले गेले. ज्यामध्ये पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी देखील एअर स्ट्राईकमध्ये 300 दहशतवादी ठार झाले. तुम्हाला दहशतवाद्यांचा खात्मा करायचा होता? की झाडं उन्मळून टाकायची होती? असा सवाल केला आहे. हा एक चुनावी जुमला आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी 'भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकवर आम्हाला शंका नाही. पण, 300 ते 350 दहशतवादी ठार झाल्याचं कुणी सांगितलं?' असा सवाल ट्विटवरून केला.

माजी केंद्रीय कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी आंतरराष्ट्रीय मीडियाचा हवाला देत एअर स्ट्राईकनं दहशतवाद्यांचं कोणतंही नुकसान झालं नाही असं म्हटलं. तुम्ही दहशतवादाचं राजकारण करताय का? असं ट्विट करत सरकारला सवाल केला.

तर, तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी भारतीय वायु दलाचं स्वागत केलं. पण, 200 ते 300 दहशतवादी ठार झाले याचा पुरावा काय? असा सवाल केला. दुसरीकडे, 'अमेरिका लादेनबाबत पुरावे देतं तर आपण AIR STRIKE चे का नाही?' असा सवाल काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केला.तसेच दिग्विजय सिंह यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख हा दुर्घटना असा केल्यानं देखील आता नवा वाद निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2019 10:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...