PM मोदींच्या वाढदिवासाला मंत्र्याचे आक्षेपार्ह ट्वीट, पाकिस्तानी नागरीकांनीसुद्धा सुनावलं

PM मोदींच्या वाढदिवासाला मंत्र्याचे आक्षेपार्ह ट्वीट, पाकिस्तानी नागरीकांनीसुद्धा सुनावलं

जगभरातून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात असताना पाकच्या मंत्र्याने वादग्रस्त ट्विट करून त्यात मोदींना टॅग केलं आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 17 सप्टेंबर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त देशासह जगभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र, पाकिस्तानातील मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी वादग्रस्त ट्विट केलं आहे. यामुळे त्यांना पाकिस्तानातूनही फवाद यांना टीकेला सामोरं जावं लागत आहे. वादग्रस्त ट्वीट करण्याची फवाद यांची ही पहिलीच वेळ नाही.

पाकचे मंत्री फवाद हुसेन यांनी आजचा दिवस आम्हाला गर्भनिरोधाचे महत्त्व काय याची आठवण करून देतो असं ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये फवाद यांनी #modibirthday असा हॅशटॅग वापरला आहे.

वादग्रस्त ट्विट केल्यानंतर फवाद यांच्यावर टीका केली जात आहे. लोकांनी फवाद यांची खिल्ली उडवत मीम्सही शेअर केली आहेत. पाकचे नागरिकदेखील त्यांच्यावर टीका करत आहेत. कराचीमधील एका नागरिकाने म्हटलं आहे की, तुम्हाला काही काम नाही. सकाळी सकाळी कसलेही ट्विट करता, सकाळी कामावर जा.

फवाद यांनी चांद्रयान-2 चा संपर्क तुटल्यानंतरही ट्विट केले होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, जे काम येत नाही ते करून नये... डिअर इंडिया. त्यानंतरही नागरिकांनी टीका केली होती. त्यांनी इंडियाला एंडिया असंही म्हटलं होतं.

VIDEO: जयराम रमेश यांनी केलं आदित्य ठाकरेंचं कौतुक

Published by: Suraj Yadav
First published: September 17, 2019, 2:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading