चक्क मुख्यमंत्री राज्यपालांच्या घराबाहेर झोपले!

चक्क मुख्यमंत्री राज्यपालांच्या घराबाहेर झोपले!

राज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर मुख्यंमत्री आणि मंत्र्यांचं काळे शर्ट घालून धरणे आंदोलन

  • Share this:

पाँडेचेरी, 14 फेब्रुवारी : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपालांमधील वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना पाँडेचेरीतही तसाच वाद निर्माण झाला आहे. पाँडेचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी आणि नायब राज्यपाल किरण बेदी यांच्यातील तणाव वाढला आहे. बुधवारी रात्रीपासून मुख्यमंत्री आपल्या मंत्र्यांना घेऊन राज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर झोपले. मोफत तांदूळ वाटपासह सरकारच्या 39 विविध योजनांना उपराज्यपालांनी मंजूरी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यात काँग्रेस आणि डीएमकेचे आमदारही सहभागी झाले आहेत.

अनेक प्रकरणांच्या प्रस्तावाला मंजूरी मिळावी यासाठी उपराज्यपालांकडे पाठवण्यात आलेला प्रस्ताव फेटाळून लावण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. उपराज्यपालांच्या या नकारात्मक भूमिकेला विरोध करण्यासाठी मुख्यंमत्री आणि मंत्र्यांनी काळे शर्ट घालून धरणे आंदोलन सुरू केलं आहे.

मुख्यमंत्री नारायणसामी म्हणाले की, गरीब आणि गरजू लोकांच्या विकासासाठी असलेल्या प्रस्तावाला फेटाळून लावलं जात आहे. याला आमचा विरोध आहे. नारायणसामीनीं सांगितलं की, जनजागृती करण्याऐवजी किरण बेदींनी हेल्मेट सक्ती केली आहेत. हा त्यांच्या मनमानी कारभाराचाच पुरावा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहेत.

धरणे आंदोलनामुळे किरण बेदी यांना निवासस्थानातून बाहेर पडणं कठिण झालं आहे. याबाबत त्यांनी किरण बेदींनी नारायणसामींना पत्रही लिहलं आहे. त्यांनी म्हटल आहे की, तुम्ही आंदोलन करण्याऐवजी माझी भेट घ्यायला हवी होती. एक पत्र लिहून धरणे आंदोलन करण्याआधी माझ्या उत्तराची वाट पहायला हवी होती. तुमच्या धरणे आंदोलनांचा फटका जनतेला होत आहे असंही किरण बेदी यांनी पत्रात म्हटलं आहे.

किरण बेदींच्या पत्रानंतरही मुख्यमंत्री नारायणसामी आणि त्यांच्या मंत्र्य़ांनी आंदोलन सुरूच ठेवलं आहेत. जोपर्यंत प्रस्तावित प्रकरणांन मंजूरी मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन करणार असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात राज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर मुख्यंमंत्र्यांनी झोपून आंदोलन करण्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी.

First published: February 14, 2019, 12:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading