पद्मावती वादाला खुनाचा रंग? नहारगडवर सापडलं लटकवलेलं प्रेत

पद्मावती वादाला खुनाचा रंग? नहारगडवर सापडलं लटकवलेलं प्रेत

प्रेताच्या बाजूला दगडावर हिंदीमध्ये पद्नावती का विरोध एका दगडावर लिहिलं होतं. तर दुसऱ्या दगडावर लिहिलं होतं,'आम्ही पुतळे जाळत नाही तर लटकवतो'. दरम्याव करणी सेनेने या घटनेशी आपला काहीच संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

  • Share this:

जयपूर,24 नोव्हेंबर: गेले काही दिवस चाललेला पद्मावती सिनेमाचा विरोध आता अधिक तीव्र झाला आहे. शुक्रवारी जयपूरजवळील  नहारगडवर एका माणसाचं प्रेत सापडलं लटकलेलं सापडलं ज्या प्रेताबाजूला असलेल्या दगडांवर पद्मावती चित्रपट विरोधी घोषणा लिहिल्या होत्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

मयत व्यक्तीचं नाव चेतन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे आत्महत्येचं की हत्येचं प्रकरण आहे ही बाब अजून स्पष्ट झालेली नाही.प्लास्टिकच्या वायरला मृत व्यक्ती लटकलेली आढळली. प्रेताच्या बाजूला दगडावर हिंदीमध्ये पद्मावती का विरोध  एका दगडावर लिहिलं होतं. तर दुसऱ्या दगडावर लिहिलं होतं,'आम्ही पुतळे जाळत नाही तर लटकवतो'. दरम्यान करणी सेनेने या घटनेशी आपला काहीच संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. ही जागा  राजस्थानची राजधानी जयपूरहून फक्त 20 कि.मी अंतरावर आहे. गेले काही दिवसांपासून पद्मावती सिनेमा वादात अडकला आहे. करणी सेनेने पद्मावतीचा विरोध तीव्र केला आहे. मध्य प्रदेश ,गुजरात सारख्या राज्यांनी पद्मावती सिनेमावर प्रसिद्धीपूर्व बंदी घातली आहे.

तर काही राजपूत नेत्यांनी पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या दीपिका पदुकोणचे हात पाय तोडण्याची  धमकी दिली आहे. तर सुप्रीम कोर्टाने या सिनेमावर देशभर बंदी घालण्यास नकार दिला आहे. तसंच सेन्सॉरला निर्णय घेऊ द्या असं स्पष्ट केलंय.

या मृत्यूमुळे आता पद्मावती चित्रपट प्रकरणाने एक वेगळंच वळण घेतलं आहे.  तरीही या प्रकरणी अजून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2017 01:53 PM IST

ताज्या बातम्या