Success Story : रोज 2 रुपये कमवणाऱ्या सरोज आज आहेत 2 हजार कोटींची मालकीण

Success Story : रोज 2 रुपये कमवणाऱ्या सरोज आज आहेत 2 हजार कोटींची मालकीण

ही कहाणी आहे, एका मुलीची. 12 व्या वर्षीच तिचं लग्न झालं. तिच्या गावात पक्के रस्तेही नाहीत पण आज मुंबईमध्ये तिच्या कंपनीच्या नावाने दोन रस्ते आहेत.जेव्हा तिने संघर्ष सुरू केला तेव्हा या स्वप्नांच्या नगरीमध्ये तिचं घरही नव्हतं. आता मात्र ती बिल्डर बनून दुसऱ्यांना घरं विकते...

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : ही कहाणी आहे, एका मुलीची. 12 व्या वर्षीच तिचं लग्न झालं. तिच्या गावात पक्के रस्तेही नाहीत पण आज मुंबईमध्ये तिच्या कंपनीच्या नावाने दोन रस्ते आहेत.जेव्हा तिने संघर्ष सुरू केला तेव्हा या स्वप्नांच्या नगरीमध्ये तिचं घरही नव्हतं. तेव्हा ती एका गुजराती कुटुंबाच्या घरी राहिली. आता मात्र ती बिल्डर बनून दुसऱ्यांना घरं विकते. पद्मश्री कल्पना सरोज यांची ही कहाणी प्रेरणादायी आहे.

महिन्याला फक्त 60 रुपये

कल्पना सांगतात, त्या मुंबईला आल्या आणि लोअर परेलमधल्या सनमिल कंपाउंडमध्ये होजिअरी कंपनीमध्ये कामाला लागल्या. तेव्हा महिन्याला फक्त 60 रुपये मिळायचे. दोनतीन वर्षं अशीच गेली. त्याचवेळी वडिलांना सांभाळण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच होती.

कल्पना यांना एका सरकारी पॉलिसीबद्दल माहिती मिळाली. यामध्ये त्यांनी 50 हजार रुपयांचं कर्ज घेतलं. यातून त्यांनी एक बुटिक सुरू केलं. कल्पना यांनी सुक्षिक्षित बेरोजगारांसोबत अशिक्षित बेरोजगारांनाही काम द्यायचं ठरवलं. काही तरुण त्यांच्याकडे त्यांच्या समस्या घेऊन येऊ लागले. एकदा एका प्लॉटच्या समस्येवर तोडगा काढताना त्या बिल्डर बनल्या.

मारण्याची सुपारी

त्या सांगतात, पुरुषप्रधान देशात माझं बिल्डर बनणं लोकांना आवडलं नाही. मला मारण्याची सुपारीही देण्यात आली. पण स्वत:च्या सुरक्षेसाठी कल्पना यांनी पोलिसांकडे रिव्हॉल्वरची परवानगी मागितली.

बिल्डरचा व्यवसाय करताकरताच कल्पना एका साखर कारखान्याच्या संचालिकाही झाल्या. मुंबईमध्ये आता कल्पना सरोज यांच्या नावाने दोन रस्ते आहेत. एक आहे, रामजीबाई कमानी आणि दुसरा रस्ता आहे पुरला कमानी. ज्या रस्त्यांवरून कधीतरी कल्पना सरोज चालतचालत कामाला जायच्या त्याच रस्त्यांना त्यांचं नाव असणं ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर एकेकाळी नोकरीच्या शोधात भटकणाऱ्या त्यांनी आता हजारो जणांना नोकरी दिली आहे.

=============================================================================================

VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी हाय-टेक रथ दाखल, अशा आहे सुविधा

First published: July 29, 2019, 6:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading