डाॅ.अभय आणि राणी बंग यांना पद्मभूषण प्रदान

या पुरस्कार प्रदान सोहळ्यात ज्येष्ठ संगीतकार इलायराजा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं

Chittatosh Khandekar | Updated On: Mar 20, 2018 10:37 PM IST

डाॅ.अभय आणि राणी बंग यांना पद्मभूषण प्रदान

20 मार्च:   राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार विजेत्यांना दिल्लीच्या दरबार हॉलमध्ये सन्मानित करण्यात आलं. यात देशभरातील तब्बल 84 मान्यवरांपैकी 43 जणांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलंय.

या पुरस्कार प्रदान सोहळ्यात ज्येष्ठ संगीतकार इलायराजा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं तर बिलियर्ड्सपटू निखिल अडवाणी, सतारवादक अरविंद पारिख यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डाॅ. अभय आणि डाॅ. राणी बंग हे डॉक्टर दांम्पत्य आणि टेनिसपटू सोमदेव देववर्मन याला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तर संपत रामटेके यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी

- इलायराजा, संगीतकार

- गुलाम मुस्तफा खान, शास्त्रीय गायक

- परमेश्वरन परमेश्वरन, लेखक आणि विचारवंत

पद्मभूषण पुरस्कार

निखिल अडवाणी, बिलियर्ड्सपटू

महेंद्रसिंग धोणी, क्रिकेटपटू

अरविंद पारिख, सतारवादक

पद्मश्री पुरस्कार

अभय बंग, वैद्यकीय क्षेत्र

राणी बंग, वैद्यकीय क्षेत्र

मनोज जोशी, अभिनेता

मुरलीधर पेटकर, जलतरण

संपत रामटेके, समाजकार्य

गंगाधर पानतवणे, लेखक  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2018 09:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close