नवी दिल्ली, 25 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी एकूण 141 जणांना गौरवण्यात येणार आहे. यामध्ये कला, क्रीडा, मनोरंजन, आर्थिक, सामाजिक, विज्ञान आणि संशोधन, उद्योग क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्यांचा समावेश आहे.
पद्म विभूषण पुरस्काराने 7 जणांना गौरवण्यात आलं आहे. यामध्ये अरुण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिस, श्री विश्वेशतीर्थ स्वामीजी श्री पेजवरा अधोखजा मठ उडुपी यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
Arun Jaitley, Sushma Swaraj and George Fernandes conferred with Padma Vibhushan award. (file pics) pic.twitter.com/OlEd2eXDs8
— ANI (@ANI) January 25, 2020
वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम, चन्नुलाल मिश्रा आणि अनेरूद जुगनाथ जीसीएसके (मॉरिशिअस) यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
वाचा : राहीबाई पोपेरे यांनी संकटांवर मात करून उभारली 'बीज बँक'
उद्योगपती आनंद महिंद्रा आणि बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला असून गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे.
वाचा : पद्म पुरस्कारांची घोषणा, राहीबाई पोपेरे, पोपटराव पवार 'पद्मश्री'चे मानकरी
मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. यामध्ये दिग्दर्शक करण जोहर, सरीता जोशी, एकता कपूर, कंगना राणौत, गायक अदनान सामी आणि सुरेश वाडकर यांचाही पद्मश्री पुरस्काराने गौरव होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.