चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, 30 ऑगस्टपर्यंत CBI कोठडी

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला आहे. चिदंबरम यांनी दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. यावर सुप्रीम कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे चिदंबरम 30 ऑगस्टपर्यंत CBI च्या कोठडीत राहणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2019 05:44 PM IST

चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, 30 ऑगस्टपर्यंत CBI कोठडी

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला आहे. चिदंबरम यांनी दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. यावर सुप्रीम कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे चिदंबरम 30 ऑगस्टपर्यंत CBI च्या कोठडीत राहणार आहेत.

पी. चिदंबरम यांची बाजू काँग्रेसचे नेते आणि वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात मांडली. चिदंबरम यांच्याबद्दलचे ठोस पुरावे नसताना तुम्ही त्यांना कोठडीत ठेवू शकत नाहीत,असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं होतं. पण CBI ने 5 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. त्यामुळे आता पी. चिदंबरम 30 ऑगस्टपर्यंत CBI च्या कोठडीत राहतील. पी चिंदबरम यांची CBI कोठडीची मुदत आज संपत होती.

काय आहे INX मीडिया खटला ?

इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांनी 2007 मध्ये INX मीडिया या नावाने कंपनी बनवली. परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या FIPB ने INX मीडिया ला 4 कोटी 62 लाख रुपयांच्या परकीय गुंवणुकीची मर्यादा दिली होती. पण INX मीडिया ने हे नियम धाब्यावर बसवून 305 कोटी 36 लाख रुपये परकीय गुंतवणूक मिळवली. या रकमेतून INX मीडिया कंपनीने बेकायदेशीररित्या 26 टक्के रक्कम न्यूज चॅनलमध्ये गुंतवली. त्यासाठी त्यांनी FIPB ची परवानगीही घेतली नव्हती. CBI च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, INX मीडिया कंपनीसाठी मॉरिशसमधल्या 3 कंपन्यांकडून बेकायदेशीररित्या पैसे येत होते, असं अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक गुप्तचर शाखेने म्हटलं आहे.

या कारणांमुळे शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

Loading...

चिदंबरम यांचं नाव खटल्यात आलं कसं ?

2007 मध्ये पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना या बेकायदेशीर परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली, असा आरोप होता. 15 मे 2017 ला CBI ने FIPB मध्ये झालेल्या अनियमततेबद्दल तक्रारही दाखल केली होती.याच वेळी या खटल्यात पहिल्यांदा पी. चिदंबरम यांचं नाव आलं.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, FIPB कडून परकीय गुंतवणुकीला परवानगी मिळवण्याबद्दल INX मीडिया चे संचालक इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांनी एका वरिष्ठ नेत्याची भेट घेतली. इंद्राणी मुखर्जीने हे वरिष्ठ नेता पी. चिदंबरम आहेत, असं CBI ला सांगितलं होतं.

================================================================================================

VIDEO : नाना पटोलेंनी काढले मुख्यमंत्री कार्यालयाचे वाभाडे, भाजपच्या गोटात खळबळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 05:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...