नवी दिल्ली, 23 सप्टेंबर: INX मीडिया प्रकरणी सध्या तिहार तुरुंगात असलेले माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सीबीआयला टोमणा मारला आहे. PM मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्य़ावर आहेत. हाऊडी मोदी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोदींची चर्चा जगभरात होत आहे. मोदींनी त्यांच्या कार्यक्रमात भारतात सर्व काही ठीक आहे असे वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देताना चिदंबरम यांनी एक ट्विट केले आहे. देशात बेरोजगारी, कमी वेतन, हिंसाचार, काश्मीरमध्ये नेत्यांची नजरकैद, नोकऱ्यांची कमतरता या गोष्टी वगळता भारतात सर्व काही ठीक चालले आहे. विशेष म्हणजे, आजच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चिदंबरम यांची तिहार तुरुंगात जाऊन भेट घेतली होती.
तुरुंगात गेल्यानंतर ट्विटवरून टीका करण्याची चिदंबरम यांची पहिली वेळ नाही. याआधी त्यांनी CBIवर टीका केली होती. सीबीआयला वाटते की मला सोन्याचे पंख लागतील आणि मी उडत हा देश सोडून बाहेर जाईन. गेल्या काही दिवसांपासून चिदंबरम तुरुंगात आहेत. यासंदर्भात गुरुवारी त्यांच्या वकिलांनी कोर्टात असा दावा केला होता की, तुरुंगात चिदंबरम यांना उशी तसेच बसण्यासाठी खुर्ची देखील दिली जात नाही. यामुळे त्यांना कंबर दुखीचा त्रास सुरु झाला आहे. अर्थात यासंदर्भात सरकारी वकिलांची बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने त्याकडे फार दखल दिली नाही आणि सांगितले की, तुरुंगात अशा छोट्या छोट्या गोष्टी होतच राहतात.
I have asked my family to tweet on my behalf the following:
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) September 23, 2019
I am honoured that Smt. Sonia Gandhi and Dr. Manmohan Singh called on me today.
As long as the @INCIndia party is strong and brave, I will also be strong and brave.
घटत आहे वजन
दरम्यान चिदंबरम यांची प्रकृती ठीक नसल्याचे वृत्त देखील समोर आले आहे. त्यांचे वजन वेगाने घटत आहे. चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टाकडे वेळोवेळी मोडिकल सर्व्हिस आणि सप्लिमेंट्री डायड देण्याची मागणी केली आहे. तिहार तुरुंगातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चिदंबरम यांना पाठ आणि पोट दुखीचा त्रास होत आहे. यामुळे त्यांना झोप घेता येत नाही.
जामीनावर होणार आज निर्णय
गेल्या गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली होती. आता त्यांच्या जामीन अर्जावर आज म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सीबीआयने 21 ऑगस्ट रोजी चिदंबरम यांना अटक केली होती. सीबीआय आणि ईडीने त्यांच्याविरुद्ध आयएनएक्स मीडिया प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. ज्यावेळी आयएनएक्स मीडिया ग्रुपला 2007मध्ये 305 कोटी रुपयांचा परदेशी निधी मिळाला होता तेव्हा त्याच अनियमितता असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. या सर्व काळात चिदंबरम हे अर्थमंत्री होते.
VIDEO: कामाला लागा, डेंग्यूच करण चालणार नाही! अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा