News18 Lokmat

Air strike : 350 दहशतवादी ठार झाल्याचं कुणी सांगितलं? - पी. चिदंबरम

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आता एअर स्ट्राईकवर काही सवाल उपस्थित केले आहे. त्याबद्दल त्यांनी ट्विट देखील केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 4, 2019 10:56 AM IST

Air strike : 350 दहशतवादी ठार झाल्याचं कुणी सांगितलं? - पी. चिदंबरम

दिल्ली, 4 मार्च : भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईवरून आता आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यामध्ये आता माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी देखील उडी घेतली आहे. यावर बोलताना पी. चिदंबरम यांनी 'भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकवर आम्हाला शंका नाही. पण, 300 ते 350 दहशतवादी ठार झाल्याचं कुणी सांगितलं?' असा सवाल केला आहे. विरोधक सध्या एअर स्ट्राईकवर पुरावे मागत असताना आता माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी देखील काही सवाल उपस्थित केले आहेत.Loading...
भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई केली यावर जगानं विश्वास ठेवावा असं जर सरकारला वाटत असेल तर त्यांनी विरोधकांवर आरोप करू नयेत असं ट्विट पी. चिदंबरम यांनी केलं आहे. यापूर्वी ममता बॅनर्जी, दिग्विजय सिंह आणि कुमारस्वामी यांनी देखील 'एअर स्ट्राईक'वर प्रश्न उपस्थित केले आहेत.


 'चौकीदार चोकन्ना है!'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाटणा येथे बोलत असताना त्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांंच्या 'चौकीदार चोर है' या विधानाचा समाचार घेत 'चौकीदार चोकन्ना है' असं प्रत्युत्तर राहुल गांधी यांना दिलं. तसेच त्यांनी विरोधकांच्या महाआघाडीवर देखील टिका केली.


200 ते 300दहशतवादी ठार?

दरम्यान, भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण, त्याबद्दलचा अधिकृत आकडा मात्र अद्याप देखील समोर आलेला नाही. यामध्ये मसूद अझरच्या भावाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यामध्ये त्यानं जैशचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं म्हटलं आहे.


Air Strike मध्ये मसूद अझहरचा मृत्यू? पाहा निवृत्त लष्कर अधिकाऱ्यांचं विश्लेषण 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 4, 2019 10:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...