Breaking: अखेर पी.चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Breaking: अखेर पी.चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

देशाचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 डिसेंबर: देशाचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. INX मीडिया घोटाळाप्रकरणी चिदंबरम यांना ईडीने अटक केली होती. गेल्या 106 दिवसांपासून चिदंबरम तिहारमधील तुरुंगात होते. सर्वोच्च न्यायालयाने 2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि देश सोडून न जाण्याच्या अटीवर चिदंबरम यांना जामीन मंजूर केला आहे.

चिदंबरम यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांचा पुत्र कार्ती चिदंबरम यांनी ट्टिट केले

चिदंबरम यांनी जामीनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली होती. कोर्टाच्या या निर्णयाला चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. जामीन मंजूर करत असताना देश सोडू न जाण्याबरोबरच चिदंबरम यांना पत्रकार परिषद देखील घेता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

काय आहे INX मीडिया खटला ?

इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांनी 2007 मध्ये INX मीडिया या नावाने कंपनी बनवली. परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या FIPB ने INX मीडिया ला 4 कोटी 62 लाख रुपयांच्या परकीय गुंवणुकीची मर्यादा दिली होती. पण INX मीडिया ने हे नियम धाब्यावर बसवून 305 कोटी 36 लाख रुपये परकीय गुंतवणूक मिळवली. या रकमेतून INX मीडिया कंपनीने बेकायदेशीररित्या 26 टक्के रक्कम न्यूज चॅनलमध्ये गुंतवली. त्यासाठी त्यांनी FIPB ची परवानगीही घेतली नव्हती. CBI च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, INX मीडिया कंपनीसाठी मॉरिशसमधल्या 3 कंपन्यांकडून बेकायदेशीररित्या पैसे येत होते, असं अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक गुप्तचर शाखेने म्हटलं आहे.

चिदंबरम यांचं नाव खटल्यात आलं कसं ?

2007 मध्ये पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना या बेकायदेशीर परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली, असा आरोप होता. 15 मे 2017 ला CBI ने FIPB मध्ये झालेल्या अनियमततेबद्दल तक्रारही दाखल केली होती.याच वेळी या खटल्यात पहिल्यांदा पी. चिदंबरम यांचं नाव आलं.

पी. चिदंबरम यांच्याविरोधात तपास सुरूच राहिला. वेळोवेळी छापेही घातले गेले पण ठोस पुरावा मिळत नव्हता. कायदे मंत्रालयाने 3 फेब्रुवारी 2018 ला चिदंबरम यांचा तपास करण्याचे आदेश दिले. ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाने कार्ती चिदंबरम यांच्या तपासाचे आदेश दिले. त्यांच्यावर छापे घातले आणि 54 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, FIPB कडून परकीय गुंतवणुकीला परवानगी मिळवण्याबद्दल INX मीडिया चे संचालक इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांनी एका वरिष्ठ नेत्याची भेट घेतली. इंद्राणी मुखर्जीने हे वरिष्ठ नेता पी. चिदंबरम आहेत, असं CBI ला सांगितलं.

इंद्राणीच्या जबाबानंतर चिदंबरम यांना अटक

इंद्राणीने तिच्या जबाबात म्हटलं होतं, पीटर मुखर्जी यांनी चिदंबमरम यांच्याशी चर्चा सुरू केली आणि INX मीडिया चा परकीय गुंतवणुकीचा अर्ज चिदंबरम यांच्याकडे सोपवला. या परवानगीच्या बदल्यात पीटर मुखर्जी यांनी कार्ती चिदंबरम यांना मदत करावी, असं चिदंबरम यांनी सांगितलं. इंद्राणी मुखर्जीचा हा जबाब ईडी ने आरोपपत्रात लिहिला आहे आणि कोर्टासमोरही तो पुरावा म्हणून सादर करण्यात आला. कार्ती चिदंबरम यांची संपत्ती INX मीडिया प्रकरणी मिळालेल्या लाचेच्या रकमेतून खरेदी करण्यात आली, असा आरोप आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 4, 2019, 10:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading